We have moved, please visit
www.MaharashtraMajha.com

 
  माझ्या महाराष्ट्राचा माझा ब्लॉग ..महाराष्ट्र माझा..  
 

!! महाराष्ट्र माझा !!
               साम । दाम । दंड । भेद

 

Make HomePage | Bookmark this site! | Know Your IP



हेही वाचाच..
  • बाळ केशव ठाकरे.
  • मागिल काहि महिन्यातील लेख.


    Advertisement:
    SMS- JOIN MYSHIVSENA to 567673434 & become a proud member of ShivSena's SMS Group.


    आणखि काहि लिंक्स..
    लाईफ़ इन बीपीओ..
    ऑर्कुट मज्जा...
    या ग्रुप मध्ये सामिल व्हा.

    Enter your email address:

    Delivered by FeedBurner


    Wednesday, December 24, 2008

    काही उडाणटप्पू लोकांनी राजच्या कानात हवा भरली आणि तो वाकड्या तिकड्या उड्या मारू लागला. तो मातोश्रीवरच मोठा झाला , माँने त्याला जेवू खाऊ घातले , माझ्या अंगाखांद्यावर खेळला. पण तरीही असा अवलक्षणी का झाला याचा विचार करतोय... अशा शब्दात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपलं मन मोकळं केलं. ‘ सामना ’ ला दिलेल्या मुलाखतीच्या अखेरच्या भागात त्यांनी या भावना व्यक्त केल्या. त्यातच त्यांनी , मी राजला लहानपणापासून पाहतोय. त्याच्या मनसेविषयी मला काहीच बोलायचे नाही. पण एवढे नक्की की राज आणि त्याच्या मनसेकडून शिवसेनेला कोणताही धोका नाही. शिवसेना एकनिष्ठ आहे आणि तशीच राहील , असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

     

    तो आम्हाला काही त्रास देण्याची शक्यता नाही असे सांगितले. मात्र मनसेशी संबंधित प्रश्नांवर उत्तरे देणे टाळले. राज शिवसेनेचेच मुद्दे वापरुन राजकारण करू पाहतोय हे मात्र त्यांनी मान्य केले. त्याचवेळी मराठीचा मुद्दा आम्हीच प्रथम मांडला आणि आजही त्याबाबत आग्रही असल्याचे ते म्हणाले. देशहितासाठी हिंदुत्वाचा आग्रह धरला तरी मराठीच्या मुद्याकडे दुर्लक्ष केलेले नाही , असेही त्यांनी सांगितले. इस्लाम हा देशाला घातक आहे , त्याविरोधात लढायला हवे असे ते म्हणाले. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचेही त्यांनी कौतुक केले. दक्षिण भारतीय भाषेच्या मुद्यावर आणि उत्तर भारतीय त्यांच्या हितासाठी एकत्र येतात तर मराठीकरिता आमच्या खासदार , आमदारांनी एकत्र येण्यात गैर काय ? , असा प्रश्न करत शिवसेना प्रांतवादाचे किंवा भाषेचे राजकारण करत देश तोडत असल्याचा आरोप त्यांनी फेटाळला. मनसे अथवा राष्ट्रवादीशी भविष्यात युती करण्याबाबत प्रश्न विचारताच त्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही.

     

    मात्र भाजपशी रुसवे फुगवे सुरू आहेत पण युती कायम असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान पदाचा उमेदवार हा कोणत्या भाषिक गटाचा आहे त्यापेक्षा तो सक्षम आहे का ? , हे तपासायला हवे असे एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणूक जिंकून महाराष्ट्रात पुन्हा सत्ता आणणे हेच सध्याचे लक्ष्य आहे असे त्यांनी स्पष्ट केले.


    Read more! / पुढे वाचा..


    Monday, December 22, 2008

    दै सामना मध्ये मा. हिन्दुह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मुलाखात चालु झाली आहे. त्यातील काहि अंश.
    --सभांना गर्दी होते आमच्या, पण ती गर्दी होऊनसुद्धा परत काँग्रेसचंच सरकार येतं महाराष्ट्राच्या बोडक्यावरती ? एवढ्या शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या. भारनियमन आहेच. लोक काळोखात बसतील, चिडतील पण नंतर काही नाही. पुन्हा काँग्रेस... अशी खंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आज सामना मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलूनत दाखवली.

    मुंबईतील दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध झाला आहे. ८२ वर्षांच्या शिवसेनाप्रमुखांनी या मुलाखतीत अत्यंत शिवराळ भाषेचा वापर केला आहे. अर्वाच्य भाषेत केंद्र सरकार व राज्यकर्त्यांना शिव्यांची लाखोलीच त्यांनी वाहिली. आणीबाणी पुकारा ! ' नपुं **' आणि ' भड *' काय देश चालवणार ? असे या मुलाखतीचे हेडिंग आहे.

    जोपर्यंत काँग्रेसचं सरकार या देशात राहील तोपर्यंत असंच राहणार. आपले ‘**’ सरकार असल्यामुळेच पाकिस्तान शेफारले. आव्हानं देऊन चालत नाही, नुसते इशारे देऊन चालत नाही. हल्ला करुन बघा, हिंमत दाखवा, असे त्यांनी केंद्र सरकारला बजावले. हे सर्व थांबवायचं असेल तर पहिली आणीबाणी पुकारा. कुणालाही सोडू नका. देशहितासाठी सांगतोय, असा ठाकरी उपाय त्यांनी सुचवला.

    अमेरिकेत फक्त एकदा आणि लंडनमध्येही एकदा रेल्वे स्टेशनांवर बॉम्ब फुटले. एकदा आणि शेवटचेच... नंतर कुणाचीच तिकडे असे हल्ले करण्याची हिंमत झाली नाही. पहिल्यांदा तुम्ही हा देश सार्वभौम आहे ही भावना लक्षात घेतली पाहिजे. आमच्यात ती भावना मुळात आहे काय ? कारण सार्वभौम देशाच्या संसदेवर हल्ला करणा-या अफझल गुरुला आपण अद्याप फाशी देऊ शकलो नाही. सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावूनही ताबडतोब जर त्या अफझलला फाशी दिली असती तर तुमची हिंमत कळली असती. कसली अडचण आहे अफझल गुरुला फाशी देण्याची ? कसला दबाव आहे तुमच्यावर ? मुसलमानांच्या मतांच्या लाचारीसाठी ते ' भड *' करताय, याची मला चीड आहे, असे ते संतापून म्हणाले.

    पवार कृषिमंत्री की क्रीडामंत्री?
    देशाचा कृषिमंत्री हा महाराष्ट्राचा नेता असतानाही राज्यात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होत आहेत. हे कृषिमंत्री आहेत की क्रीडामंत्री, असा सवाल करीत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी रविवारी सासवड येथील सभेत घणाघाती टीका केली.

    सासवड येथील पालखी चौकात उद्धव ठाकरे यांची प्रथमच जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. मुुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या मृत्यूबाबत शंका घेणाऱ्या अंतुलेचा राजीनामा घेण्यासाठी काँग्रेस धजत नाही. कारण त्यामुळे त्यांना हिरवी मते गमावावी लागतील. अशा प्रकारे जर सरकार वागत असेल तर आम्हांला आता हिंदुत्त्वाची तलवार उपसून सरकार पाडावे लागेस, असे ठाकरे यावेळी म्हणाले.

    मुंबईत दहशतवादी हल्ला झाल्यांनतर २४ तासाच्या आत काँग्रेस सरकारने अतिरेक्यांची ठाणी उडवून द्यायची कारवाई करायला हवी होती. मात्र काँग्रेसचे नेते नुसतेच बोलण्याचे काम करतात, असे ठाकरे म्हणाले.

    Read more! / पुढे वाचा..


    Sunday, December 21, 2008

    नमस्कार,
    आपल्या ब्लॉग चा ईमेल फ़िड प्रोवायडर आज पासुन FeedBlitz राहिल्.

    सहकार्य् असावे.
    आशिष कुलकर्णी

    ---------------------

    Read more! / पुढे वाचा..


    Saturday, December 20, 2008

    महाराष्ट्राला मोठा सागर किनारा लाभला आहे. अनेक खाड्यामुळे हा सागर किनारा दंतुर झालेला आहे. सृष्टी सौंदर्याने नटलेल्या या सागर किनार्‍याजवळ अनेक प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक घटनांना उजाळा देणार्‍या अनेक स्थळांचा समावेश होतो. या किनार्‍यावर असलेल्या जलदुर्गांमध्ये रायगड जिल्ह्यातील जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे.

    रायगड जिल्ह्याच्या पश्चिम अंगाला अरबी समुद्र (जुने नाव सिंधूसागर) आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुका वसलेला असून तालुक्याचे मुख्य ठिकाण मुरुड येथेच आहे. मुरुडमधून चार पाच किलोमीटर अंतरावर राजपुरी हे गाव आहे. हे गाव खाडीच्या किनार्‍यावर आहे. येथून जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे.

    जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रुढ झालेला आहे. अरबी भाषेतील जझीरा या शब्दावरुन तो आलेला आहे. जझीरा म्हणजे बेट. या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता. त्यावेळी राजपुरीला मुख्यत: कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटारु आणि चाचे लोकांचा नेहेमीच उपद्रव होत असे. तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेढेकोट उभारण्यात आला. मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे रहात असत. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील. हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती. मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानीसा झाला. त्यामुळे ठाणेदाराने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमरवानाची नेमणूक केली.

    राम पाटील आपल्याला मेढेकोटाच्या जवळही फिरकू देणार नाही, याची कल्पना पिरमनवानाला होती. तो अतिशय चतुर होता. त्याने आपण दारुचे व्यापारी आहोत, असे भासवून आपली गलबते खाडीत नांगरली. राम पाटीलाशी स्नेह राहावा म्हणून दारुचे काही पिंप त्याने भेट म्हणून पाठवली. त्यामुळे राम पाटील खूष झाला. पिरमरवानाने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पिरमरवाना मेढेकोटात गेला. रात्री सर्व कोळी दारु पिऊन झिंगले असताना पिरमरवानाने बाकीच्या गलबतांमधून असलेले सैन्य तेथे उतरवून सर्वांची कत्तल करुन मेढेकोट ताब्यात घेतला.

    पुढे पिरमरवानाच्या जागी बुर्‍हाणरवानाची नेमणूक झाली. त्याने तेथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली. सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुर्‍हाणरवानाने बांधलेले आहे. पुढे इ.स.१६१७ मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानचा हा मूळ पुरुष समजला जातो.

    जंजिर्‍याचे सिद्दी हे मुळचे ऑबिसिनियामधील. हे दर्यावर्दी शूर, काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी होवू शकला नाही. छत्रपती शिवाजी राजांनाही जंजिर्‍यावर स्वामित्व मिळवता आले नाही. इ.स.१६१७ ते १९४७ अशी ३३० वर्षे जंजिरा अंजिक्य राहिला.
    जंजिर्‍याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. होडीने आपण प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो. या प्रवेशद्वाराच्या आत एक उपदार आहे. प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे. बुर्‍हाणखानाची दर्पोक्तीच या चित्रातून दिसून येते. एका वाघाने चारही पायात चार हत्ती पकडलेत व शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे, असे ते चित्र आहे. बुर्‍हाणखान इतर सत्ताधिशांना सुचवतोच की, तुम्ही हत्ती असाल, मी पण शेर आहे. या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करु नका.

    जंजिर्‍याची तटबंदी बुलंद आहे. त्याला सागराकडे ही एक दरवाजा आहे. एकोणीस बुलंद असे बुरुज आहेत. दोन बुरुजांमधील अंतर ९० फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायर्‍या ठेवलेल्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत. त्या कमानीमध्ये तोंड करुन तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिर्‍यावर ५१४ तोफा असल्याचा उल्लेख आहे. यातील कलालबांगडी, लांडाकासम व चावरी या तोफा आजही पाहायला मिळतात.

    किल्ल्याच्या मध्यभागी सुरुलखानाचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत आहे. पाण्याचे दोन मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी तीन मोहल्ले होते. यातील दोन मोहल्ले मुसलमानांचे व एक इतरांचा असे होते. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती सर्व वस्ती तेथून उठून गेली.

    जंजिर्‍याच्या तटबंदीवरुन विस्तृत भाग दिसतो. यात सागरातील कासा उर्फ पद्मदुर्ग व किनार्‍यावरील सामराजगड ही येथून दिसतो. ३३० वर्षे अभेद्य आणि अंजिक्य राहिलेल्या जंजिरे मेहरुब पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरुन तरळून जातो. थोडा इतिहासाचा अभ्यास करुन जंजिर्‍याला भेट दिल्यास ती निश्चितच संस्मरणीय ठरेल.

    Read more! / पुढे वाचा..


    स्वाभिमानाच्या गप्पा मारणारे पक्षातून हकालपट्टीची वाट पाहत नाहीत, असा टोला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नारायण राणे यांना शुक्रवारी लगावला. काँग्रेसमधून निलंबित झाल्यापासून राणेंनी विलासरावांवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. 'स्टार माझा' या न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत विलासरावांनी त्या आरोपांची सव्याज परतफेड केली.

    देशमुख म्हणाले की, राणे 'स्वाभिमान' नावाची संघटना चालवतात. पण त्या संघटनेचे नाव स्वाभिमान ठेवल्याने स्वाभिमान येत नाही. त्यांना पक्षातून निलंबित केलं आहे, हा इशारा त्यांच्यासाठी पुरेसा आहे. ते सतत माझ्याबद्दल बोलत आहेत, कारण देशमुखांना 'टार्गेट' केले की प्रसिद्धी मिळते हे राणेंना चांगलेच माहीत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

    भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी केलेल्या आरोपांचाही विलासराव देशमुख यांनी समाचार घेतला. भाजपवाल्यांना गोबेल्स नीती चांगली अवगत असते. गडकरींना या प्रकरणात कुणी माहिती पुरवली याची आपल्याला पूर्ण माहिती आहे. मात्र कुणाकडून माहिती घेताना त्याची खात्री करावी, एवढी तसदीही गडकरींनी घेतली नाही. मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो, तेव्हाही गडकरींनी माझ्यावर अशा प्रकारचे आरोप केले होते. आतापर्यंत त्यांनी माझ्यावर अनेक आरोप केले. मात्र त्यातील एकही आरोप सिद्ध होऊ शकला नाही. गडकरींच्या आरोपांविरोधात आपण कोर्टात जाणार आहोत, असे ते म्हणाले.

    ' इंडिया बुल्स' कंपनीशी अमित देशमुख आणि अहमद पटेलांच्या मुलाचे हितसंबंध गंुतले असल्याचा गडकरींनी आरोप केला होता. त्याबाबत बोलताना, या कंपनीशी माझ्या किंवा पटेल यांच्या मुलाचे संबंध असल्याचे गडकरी यांनी सिद्ध करून दाखवावे, असे आव्हानही देशमुख यांनी दिले आहे. माझी मुले आणि अहमद पटेल यांची मुले एकमेकांना ओळखतही नाहीत, असा खुलासा करून गडकरींनी यापूर्वीही बेजबाबदारपणे आरोप केले होते आणि त्यांनी माफीही मागितली होती, असं त्यांनी स्पष्ट केले.

    नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आपण गैरहजर असल्याची चर्चा झाली. मात्र वैयक्तिक अडचणींमुळे आपण हजर राहू शकलो नाही. सोमवारी आपण अधिवेशनासाठी जाणार आहोत, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

    Read more! / पुढे वाचा..


    भारतविरोधी प्रचार करणा-या सीडींचा मोठा साठा मालेगावमधून पोलिसांनी हस्तगत केला आहे. मुस्लिमांना भडकवण्यासाठी या सीडी येथे वितरणासाठी आणल्याची माहिती आहे.

    'पॅलेस्टाईन आणि काश्मीर स्वतंत्र करण्यासाठी बलिदानाची तयारी ठेवा' अशा आशयाच्या गाण्यांतून मुस्लिम समाजाला भडकावण्याचे काम या सीडीतून केले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर मालेगाव पोलिसांनी काही दुकानांवर छापे घालून त्यांचा साठा जप्त केला. 'भारतीय लष्कराचा नष्ट करा' असे आवाहनदेखील यातील गाण्यांच्या कडव्यात आहे.भारतापासून काश्मिर वेगळा करा, भारतीय लष्कराला हाकलून लावा, असे प्रक्षोभक आवाहन करणाऱ्या या सीडीच्या माध्यमातून मुस्लीमबहुल असलेल्या मालेगावातील शांतता व सलोखा मोडीत काढण्याचा कट रचल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. अशा सीडी आढळल्यास त्याची माहिती कळवावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

    Read more! / पुढे वाचा..


    Wednesday, December 17, 2008

    निरपराध्यांचे रक्त सांडणा-या नराधम अतिरेक्यांवर खटले कसले चालवता ? त्यांना बचावाची संधी कसली देता ? लोकशाही व न्याय प्रक्रियेचे फालतू अवडंबर माजवून त्या नराधमांना सरकारी पाहुणे म्हणून का पोसता ? असा भडिमार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला आहे. त्याची काहीएक गरज नसून त्या एकमेव जिवंत नराधमास, रक्तपिपासू अतिरेक्यास कोणत्याही चौकशीशिवाय जाहीर फासावर लटकवा. ज्या छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये त्याने हिंसेचे तांडव केले त्याच टर्मिनससमोर त्या नराधमास फासावर लटकवा. एकदा नाही, शंभरवेळा फासावर लटकवा, असे फर्मान ठाकरे यांनी जारी केले आहे.


    जगाने कसाबला निर्घृण हत्याकांड करताना पाहिले. तेव्हा पुरावे कसले तपासता, चौकशांचे फार्स कसले करता ? असा परखड सवाल बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या ‘ सामना ’ या मुखपत्रातील संपादकीय लेखात केला आहे. अतिरेकी उद्या एखाद्या विमानाचे अपहरण करुन प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात कसाबच्या मुक्ततेची मागणी होईल आणि ती सुटका केली जाईल. कसाबला घेऊन एक खास विमान लाहोर किंवा कराचीला उतरेल. शेवटी त्या मसूद अजहर मसूदला सोडण्यासाठी पाकड्यांनी तोच डाव रचला. कसाबच्या बाबतीत ते घडू नये असे वाटत असेल तर त्याला फासावर लटकवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.


    कसाबचे वकिलपत्र घेऊ इच्छिणा-या ‘ मानवतावादी ’ वकिलांनाही ठाकरे यांनी जोरदार तडाखा दिला आहे. कसाबसारख्या नराधमाचे वकिलपत्र घेण्याची हिंमत आमच्याच मातीतले बेइमान करतात. दहशतवादी हल्ल्यातील रक्त सुकण्याआधीच त्या कसाबच्या बचावासाठी वकिलांनी काळे डगले चढविले. ज्यांना या कसाबचा पुळका आला आहे, त्यांनी आपले प्रियजन कसाब नावाच्या या कसायाच्या तावडीत द्यावेत व मगच दयावान बनून त्याच्या बचावासाठी उभे राहावे. दुस-याचे रक्त सांडते तेव्हा फक्त हळहळ व्यक्त केली जाते, आपले प्रियजन दहशतवादी हल्ल्यात मरत नाहीत तोपर्यंतच या लोकांना मानवता वगैरे फडतूस गोष्टी आठवतात. उगाच आगीशी खेळू नका. कसाबच्या वकिलपत्रास हात लावाल तर जनक्षोभ उसळेलच उसळेल व शिवसेनाही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

     

    आपली प्रतिक्रीया जरुर लिहा..



    Read more! / पुढे वाचा..


    Tuesday, December 09, 2008

    अमेरिकेतील बराक ओबामांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत मुख्यमंत्री अशोक

    चव्हाण यांनी जनसंपर्कासाठी ' ई-मेल ' चा हायटेक पर्याय स्वीकारला खरा... पण त्यासाठी अधिकृत सरकारी वेबसाइटवर अविश्वास दाखवत खासगी ई-मेल सेवेचा आधार घेतलाय. मुख्यमंत्र्यांचा हा ‘ अविश्वास ’ सार्थ ठरवत सरकारी वेबसाइटनेही अद्याप विलासराव देशमुखांनाच मुख्यमंत्रीपदी बसवले आहे.


    जनतेच्या मनात सरकार आणि प्रशासनासंदर्भात असलेले प्रश्न तसेच सूचना मुख्यमंत्र्यांना थेट पाठविता याव्यात यासाठी अशोक चव्हाण यांनी नवा ई-मेल जाहीर केला आहे. ashokchavanmind@rediffmail.com असा पत्ता त्यांनी आज प्रसारमाध्यमांमार्फत महाराष्ट्रातील जनतेसाठी पाठवला. मुळात सरकारी साइटवर मुख्यमंत्र्यांचा chiefminister@maharashtra.gov.in हा अधिकृत ईमेल पत्ता असताना , चव्हाण यांनी ‘ रेडिफ ’ या खासगी कंपनीवर विश्वास दाखवला आहे.


    महाराष्ट्र शासनाची http://maharashtra.gov.in/ ही स्वतःची अधिकृत वेबसाइट असून , त्यावर ' महा आयटी राष्ट्र ' असे कौतुक मिरवले आहे. पण आयटीचा एवढा उदोउदो करणा-या या साइटवर अविश्वास दाखवत मुख्यमंत्र्यांनी आपला खासगी ई-मेल लोकांसाठी खुला केला आहे.
    त्यांचे हे वागणे चुकीचे आहे , असेही म्हणायला नको. कारण महा-आयटी-राष्ट्राच्या या अधिकृत साइटने अजून अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री म्हणून मान्यताच दिलेली नाही. मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यांमुळे जगभरातून महाराष्ट्रातील सरकारकडे लक्ष असताना या ग्लोबल एडिशनला नवा मुख्यमंत्रीच माहित नाही. त्याच्या मुख्यमंत्र्यांच्या लिंकवर आजही विलासराव देशमुख मुख्यमंत्री असून , बाकीचे मंत्रीही तसेच आहेत.


    आर. आर. पाटील गृहखात्यातून पायउतार होऊन आठवडा उलटून गेला , तरी या महा-आयटी-राष्ट्राच्या साइटसाठी ते गृहमंत्रीच आहेत. त्यांच्या चीनच्या दौ-याचे फोटो झळकवीत त्यांच्याच डोक्यावर गृहमंत्रीपदाचा मुकुट ठेवण्यात , या साइटला धन्यता वाटते. त्यामुळेच आता मुख्यमंत्र्यांचे चुकले की या सरकारी साइटचे हे या महा-आयटी-राष्ट्रालाच ठरवावे लागेल.


    Read more! / पुढे वाचा..


    Saturday, December 06, 2008

    काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधींसह संपूर्ण पक्षाच्याच कार्यपद्धतीवर टीकेची झोड उठवणा-या नारायण राणे यांच्यावर आज पक्षश्रेष्ठींनी अपेक्षेप्रमाणे कारवाईचा बडगा उगारला. राणे यांना पक्षातून निलंबित करत असल्याची घोषणा दिल्लीत करण्यात आली. त्यामुळे आता राणेंची स्ट्रॅटेजी काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.

    मुख्यमंत्रिपदी अशोक चव्हाण यांचं नाव जाहीर होणार, हे स्पष्ट झाल्यानंतर भडकलेल्या नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसविरुद्ध बंडाचा झेंडा उभारला होता. काँग्रेसवर माझा विश्वास नाही, अगदी सोनिया गांधींवरही नाही. केवळ पैशासाठी, स्वार्थासाठी हा पक्ष चालवला जातोय, त्यामुळे मला या पक्षात कुठलंही पद नको, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला होता. त्यांचा हा आविर्भाव पाहून, ते काँग्रेसला राम-राम करतील, असेच संकेत मिळाले होते. परंतु, त्यांनी काही घोषणा करण्याआधीच, आज काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांना निलंबित केल्याची घोषणा केली.

    राणेंच्या कालच्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले होतेच. त्यानुसारच आज पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी राणेंना निलंबित करत असल्याचं जाहीर केलं.

    राणेंच्या सर्टिफिकेटची गरज नाही!
    माझं क्वालिफिकेशन काय, हे सांगण्यासाठी मला कुणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही ' , असं ठणकावून सांगत महाराष्ट्राचे नियोजित मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे नारायण राणे यांना सणसणीत टोला लगावला आहे.

    अशोक चव्हाण यांनी आज सकाळी चैत्यभूमीला भेट देऊन महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. त्यानंतर, राणेंच्या कालच्या टीकेबद्दल विचारलं असता, त्यांनी राणेंना थेट धुडकावूनच लावलं.


    मुख्यमंत्री घोषणेला उशीर का झाला?
    मुख्यमंत्रिपदासाठी आमदारांची मते जाणून घेतल्यानंतर प्रणव मुखर्जी व ए. के. अँटनी या निरीक्षकांनी गुरुवारी रात्री आपले मत फोनवरून पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना कळवले होते; मात्र, बैठकीबाहेर नारायण राणे यांचे समर्थक जमले असून नव्या नेत्याची घोषणा केल्यास गोंधळ होऊ शकतो, याची जाणीव झाल्याने निर्णय शुक्रवारपर्यंत लांबला!

    हायकमांडने आपल्या इच्छेनुसार मुख्यमंत्री लादला, असा आक्षेप सोनियांना नको होता. यासाठी शुक्रवार सकाळपासून राणे यांना शांत करण्यासाठी काय करता येईल, याची त्यांच्या निकटवतीर्यांकडे चौकशी सुरू झाली. सुशीलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यास राणे यांचा फार आक्षेप रहाणार नाही. ते शांत होऊ शकतील, असे काहींनी सुचवले. निवडणुकीच्या वर्षात दोन गटांचे भांडण विकोपाला नेण्याऐवजी मध्यममार्ग म्हणून पुन्हा एकदा सुशीलकुमार यांची निवड करण्याचाही सोनियांच्या निवासस्थानी गांभीर्याने विचार झाला. त्याचवेळी, हायकमांड आपल्या नावाला अनुकूल नसून अशोक चव्हाण यांचा गांभीर्याने विचार सुरू असल्याचा सुगावा लागताच राणे यांनी मुंबईत तडकाफडकी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेतृत्वासह सगळ्यांवरच हल्लाबोल केला. दिल्लीत याचे वृत्त धडकताच शिंदे भूतानहून भारतात परतण्याची वाट पाहाण्यासही वेळ उरला नाही. त्यामुळे राणे यांचा मुंबईत हल्लाबोल सुरू असतानाच चव्हाण यांच्या नावाची घोषणा दिल्लीत झाली.

    नेतेपदाच्या निवडीबाबत एकूण ९७ आमदारांची मते जाणून घेण्यात आली. विधानसभेच्या ७५ सदस्यांपैकी ७२, विधान परिषदेच्या २१ सदस्यांपैकी १६ तसेच सत्ताधारी काँग्रेसला सहकार्य करणाऱ्या १२ अपक्ष व सहयोगी सदस्यांपैकी ९ सदस्यांनी मोकळेपणाने आपली भूमिका पक्ष निरीक्षकांपाशी व्यक्त केली.

    Read more! / पुढे वाचा..



    स्वतःचा ’ईमेल’ नोंदवा व मोफ़त अपडेट्स मिळवा.
     
    SMS Alerts: मोफ़त माहिती मिळवा मोबाईल वर.

    ओळख ब्लॉगरशी.

    आशिष कुलकर्णी, महाराष्ट्र माझा हा ब्लॉग २००३ साली सुरु केला. मी संगणक व्यवस्थापन या विषया मध्ये उच्च शिक्षण घेतलेले आहे. माझ्या समाजकारण आणि राजकारण यांच्या आवडिपोटी चालु केलेला हा ब्लॉग आपल्या पसंतीस पडेल हिच आशा ठेवतो.


    Follow Ashish Kulkarni on twitter


    सेन्सेक्स चे आकडे (LIVE)
    BSE

    Graph

    NSE
    Graph
    सौजन्य: economictimes.com indiainfoline.com

    ताज्या बातम्या / Latest News






    © Ashish, Some Article can not be copied by any means without written permission.
    Life in BPO | Orkut Fun