We have moved, please visit
www.MaharashtraMajha.com

 
  माझ्या महाराष्ट्राचा माझा ब्लॉग ..महाराष्ट्र माझा..  
 

!! महाराष्ट्र माझा !!
               साम । दाम । दंड । भेद

 

Make HomePage | Bookmark this site! | Know Your IP



हेही वाचाच..
  • बाळ केशव ठाकरे.
  • मागिल काहि महिन्यातील लेख.


    Advertisement:
    SMS- JOIN MYSHIVSENA to 567673434 & become a proud member of ShivSena's SMS Group.


    आणखि काहि लिंक्स..
    लाईफ़ इन बीपीओ..
    ऑर्कुट मज्जा...
    या ग्रुप मध्ये सामिल व्हा.

    Enter your email address:

    Delivered by FeedBurner


    Thursday, June 26, 2008

    कालच ज्येष्ठ साहित्यिक आणि समिक्षक अरुण साधु यांची प्रतिक्रिया वाचली. प्रतिक्रिया कळण्या अगोदर क्रिया कळणे आवश्यक आहे, त्या मुळे पहिल्यांदा ती सांगतो. आपले मराठि साहित्य सम्मेलन अमेरिकेत घ्यायचे ठरले आहे. या क्रियेवर या महाशयांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. "यंदाची वारी हुकणार." यांची मागच्या वारीतील ’हालचाल’ आठवली आणि त्यांच्या या बोलण्याची फ़ार गम्मत वाटली.
    या साहेबांना मागच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची जवाबदारी नवीन अध्यक्षांना सोपवायची होती. (सांगली येथे भरले होते ते). माळ आपल्या गळ्यातुन काढायची, आणि दुसर्याच्या गळ्यात घालायची. एवढेच काय ते काम. याच्या अगोदर किती साहित्य संमेलनास यांनी उपस्थिती लावली होती? तर स्वतःच सांगतात, मी अध्यक्ष होण्या अगोदर एकाही संमेलनाला उपस्थित राहिलो नहिए. तरी हि यांच्या गळी अध्यक्ष पदाची माळ पडली. या वर्षी साहेब भलतेच उत्साहात आले. बरेच काहि बोललेहि. पण आपण आजतागायत एकाहि संमेलनास उपस्थित रहिलेलो नाहिये, आणि आता डायरेक्ट अध्यक्षपद.. हे कदाचित जाणवलेकि काय देव जाणे पण साधुंनी बरोबर आदल्या रात्री संमेलनातुन पळ काढला. जाता जाता ’बहिष्कार’ हा गोंडस शब्द मात्र उच्चारायला विसरले नाहित. ज्याने सुरवात होते त्या ग्रंथदिंडीत मात्र सामील झाले. कुठे कोणाला काहि बोलले नाहित, चेहर्यावर नापसंदिची एक साधी रेष हि नाहि, आणि गेलेकि पळुन काहि तास अगोदर. तर असा हा माणुस आज पुन्हा प्रतिक्रिया देतायत कि वारी चुकेल म्हणे.
    हि लोके अमेरिकेत जातील कि नाहि माहित नाहि, पण जर जाणार असतील तर या अश्या साधु-संताना पहिल्यांदा वेचुन बाजुला काढा नाहितर हि लोके ऐनवेळि नक्कि तमाशा घालणार. एक काळि यादिच बनवा नाहितर. या असल्या लोकांची कितीही मने सांभाळा, हि लोके चार चौघात आपले नाव ’रोशन’ केल्या शिवाय राहणार नाहित.
    अमेरिकेत जाउन तिथल्या लोकांसमोर फ़ुकटचा तमाशा नको. ते संमेलन होइल तेंव्हा होइल पण आत्ताच या लोकांचा तमाशा चालु झाला आहे. होय, तमाशाच. संमेलन अमेरिकेत भरवणार म्हटल्यावर काय तो दंगा. पुढचे पाउल पडतय पडुदेना. पण नाहि, अडवा पडला नाहितर मराठी माणुस कसला? मराठी माणसाला खेकड्याची उपाधी का देतात ते अत्ता समजत आहे मला, अरे रंगित तालीमच होतिये म्हणाना. जात आहेत अमेरिकेत जाउदेत कि. का यांच्या पोटात गोळा. पोहुचुदेत ना जगातल्या कानाकोपर्यात. कारण देत आहेत कि याने सामान्य माणुस तुटेल, तो येऊ शकणार नाहि वगैरे वगैरे. इथे राहुनहि किती सामान्य मराठी माणसाला सांभळले या लोकांनी? कुठे यांचे साहित्य सामान्यांच्या आवाक्यात आहे. पुस्तक विक्री: पाने २००, किम्मत २५०. वारे वा!
    उद्या जर एखादा अंबानी उठला आणि म्हणाला कि "मि या साहित्यीकांचा खर्च उचलतो" तर? तर हे जे आत्ता घसा काढुन बों.. ओरडत आहेत ना हिच लोके पिशव्या भरुन पहिला मी-पहिला मी करत रांगा लावतील अमेरिकेत जाण्यासाठी. दुःख याचे नाहिये कि संमेलन अमेरिकेत चाललय.. पण दुःख याचे आहे कि ’हे चाललेत (फ़ुकट)पण मला जाता येत नाहिये’. मागचे संमेलन भरले होते नाहो भारतातच.. महाराष्ट्रातच, मग का सुखाने नाहि पार पाडले? का त्यात एक दिलाने नाहि सहभागी झालात?
    होय मला अभिमान आहे कि माझ्या मराठि साहित्याचे संमेलन अमेरिकेत होणार आहे. जावा अमेरिकेत जावा. मराठिचा आवाज पुर्ण जगात घुमवा, बुलंद करा. या ओरड्यांसाठी घेउना एखादा छोटा कार्यक्रम महाराष्ट्रात. ते असते ना..कि लग्न गावाकडे आणि एक छोटे रिसेप्शन मुंबईत. तसेच कहिसे इथेहि कराना एवढा दंगा करायच्या ऐवजी. हि साहित्य संमेलने वगैरे काहि साहित्याच्या पुजे साठि अथवा श्रेष्ठत्वा साठि होत नाहित आजकाल तर तुझ्या पेक्षा मि साहित्यीक श्रेष्ठ हेच एकमेकाला दाखवुन द्यायचे आखाडे झालेत. नाहितर अध्यक्ष पदावरुन एवढे वाद कशाला झाले असते? मला तिकीट द्या नाहितर मि बंडखोरी करतो.. हाच सुर या साहित्यिकांचा पण असावा? अमेरिकेतहि आहेत कि मराठी माणसे, आणि कदाचीत इथल्या लोकांपेक्षा जास्त साहित्याची किम्मत त्यांना कळत असावी. कारण माती पासुन, आई पासुन हि लोके जास्त लांब आहेत.
    पुढे जाणार्यांना सहकार्य करता येत नसेल तर मागे तरी खेचु नका. शांत तरी बसा. आज आपण आपल्या महाराष्ट्राच्याच नव्हे तर हिंन्दुस्तानाच्या सीमा ओलांडुन बाहेर ऊडि मारतोय, हि गोष्ट अभिमानाची तर आहे. का नुसती गाणीच ऐकत बसायची.."आकाशी झेप घे रे पाखरा..तोडी सोन्याचा पिंजरा". संमेलन हिंन्दुस्तानात भरुदे, अमेरिकेत अथवा ’उत्तर ध्रुवावर’ साहित्याचे काहि नुकसान होणार नाहि. अरे कोणाच्यात एवढि ताकत आहे कि मराठि साहित्यास ठेच पोहचवावी. या दंगेखोर साहित्यिकांस एवढेच सांगणे कि तुमचे साहित्य संमेलन अमेरिकेत भरल्यावर सामान्य माणसाला किती फ़रक पडेल याचा विचार करण्या अगोदर, जर साहित्य संमेलन भरलेच नाहि तर सामान्य माणसाला कितीसा फ़रक पडेल याचा हि एकदा विचार करा.

    तुमचाच, आशिष कुलकर्णी.

    Read more! / पुढे वाचा..


    Friday, June 20, 2008

    १९ जुन १९६६ रोजी मराठी माणसाच्या न्याय्य आणि हक्कासाठी लढणारी संघटना, शिवसेनेची स्थापना प्रबोधनकारांच्या आशिर्वादाने झाली. शिवसेनेची सर्व सुत्रे शिवसेनाप्रमुख म्हणून बाळासाहेबांनी आपल्याच हाती घेतली. शिवसेनेची सभासद नोंदणी सुरु झाली. त्यावेळी 'रविवारची जत्रा' मध्ये एक ओळ यायची 'शिवसेनेचे सभासद व्हा!' दर आठवड्याला हजारो लोक शिवसेनेचे सभासद होत होते. सर्व सभासदांना मार्गदर्शन करण्याचे ठरले.

    सभा कुठे घ्यावी याची चर्चा सुरु झाली. अनेक सभासदांचे म्हणणे होते कुठेतरी एखाद्या सभागृहात सभा घ्यावी. पण साहेबांना जबरदस्त आत्मविश्वास होता त्यांनी सांगितले कि, ' पहिली जाहिर सभा शिवाजी पार्कलाच होईल.'

    सभेची तयारी सुरु झाली. सर्वांना शंका वाटत होती सभा यशस्वी होईल कि नाही. सभेची तारीख विजयादशमीची ३० ऑक्टोबर १९६६ ठरली. त्यानंतर सर्वांना माहितच आहे एक झंझावत आजपर्यंत महाराष्ट्रात घोंघावतच आहे.

    तीन वर्षापूर्वी दोन फुसक्या बारांनी शिवसेनेला हादरे देण्याचा प्रयत्न केला. स्वकियांनी केलेल्या गद्दारीचा साहेबांना जरूर प्रचंड दु:ख झाले. प्रसारमाध्यमे आणि वृत्तपत्रांमध्ये एकच कोलाहल सुरू झाला 'आता शिवसेना संपली'. पण मराठी माणसाच्या काही वेगळेच होते. त्याला शिवसेना मनापासून हवी होती म्हणूनच राजकाराणात नविन असूनही माननिय कार्याध्यक्ष श्री. उद्धवजींनी या काळात शिवसेनेचे खंबीर नेतृत्व करून पुन्हा एकदा शिवसेनेला तेच वैभव प्राप्त करून दिले.

    पक्षातून गेलेल्या गद्दारांना केवळ एकाच वर्षात त्यांची लायकी दाखवून दिली. आज शिवसेना जबरदस्त ताकदिनिशी वाटचाल करत आहे. श्रीवर्धन पोटनिवडणूकीपासून ते परवाच्या ठाणे लोकसभा पोटनिवडणूकीपर्यंत शिवसेनेची विजयी घौडदौड मा. उद्धवजींच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. नविन नविन संघटना, लोक आणि तरूण शिवसेनेकडे आकर्षित होत आहेत. मंत्रालयावर जशी गर्दी असते किंबहुना तशीच गर्दी आज मातोश्री आणि शिवसेना भवनवर दिसते. शेतकरी मेळावे आणि इतर योजनाबद्ध आंदोलनामुळे जनतेमध्ये उद्धवजींबद्दल प्रचंड विश्वास आहे. तोच विश्वास शिवसेनेला विधानसभेत नेईल हेच संकेत आज दिसत आहेत.

    शिवसेनेच्या ४२व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व शिवसैनिकांना मनापासून शुभेच्छा!

    जय हिंद! जय महाराष्ट्र!!

    (धन्यवाद अमित चिवीलकर)

    Read more! / पुढे वाचा..



    स्वतःचा ’ईमेल’ नोंदवा व मोफ़त अपडेट्स मिळवा.
     
    SMS Alerts: मोफ़त माहिती मिळवा मोबाईल वर.

    ओळख ब्लॉगरशी.

    आशिष कुलकर्णी, महाराष्ट्र माझा हा ब्लॉग २००३ साली सुरु केला. मी संगणक व्यवस्थापन या विषया मध्ये उच्च शिक्षण घेतलेले आहे. माझ्या समाजकारण आणि राजकारण यांच्या आवडिपोटी चालु केलेला हा ब्लॉग आपल्या पसंतीस पडेल हिच आशा ठेवतो.


    Follow Ashish Kulkarni on twitter


    सेन्सेक्स चे आकडे (LIVE)
    BSE

    Graph

    NSE
    Graph
    सौजन्य: economictimes.com indiainfoline.com

    ताज्या बातम्या / Latest News






    © Ashish, Some Article can not be copied by any means without written permission.
    Life in BPO | Orkut Fun