We have moved, please visit
www.MaharashtraMajha.com

 
  माझ्या महाराष्ट्राचा माझा ब्लॉग ..महाराष्ट्र माझा..  
 

!! महाराष्ट्र माझा !!
               साम । दाम । दंड । भेद

 

Make HomePage | Bookmark this site! | Know Your IP



हेही वाचाच..
  • बाळ केशव ठाकरे.
  • मागिल काहि महिन्यातील लेख.


    Advertisement:
    SMS- JOIN MYSHIVSENA to 567673434 & become a proud member of ShivSena's SMS Group.


    आणखि काहि लिंक्स..
    लाईफ़ इन बीपीओ..
    ऑर्कुट मज्जा...
    या ग्रुप मध्ये सामिल व्हा.

    Enter your email address:

    Delivered by FeedBurner


    Saturday, August 15, 2009

    Suhas Shirwalkar, Suhas Shirwalkar Books
    सुहास शिरवळकर.. माझा आवडता लेखक.
    पुस्तके मि अनेक वाचली आहेत पण ज्या पुस्तकां मध्ये मला माझ्या आजुवाजुचे विश्व आहे तसे दिसले ती होती फ़क्त सुशिंचीच. एकदा पुस्तक हातात घेतले की ते संपुर्ण संपेपर्य़ंत खालिच ठेवु शकत नाहि अशी हि लिखाणाची अफ़लातुन शैली. वाचनालयातुन पुस्तक आणायचे आहे ना... फ़क्त एकच अट "लेखक सुहास शिरवळकर पाहिजेत" बास.. आणि काहि नको. त्याच सुहास शिरवळकरांच्या पुस्तकातील काहि मजकुर इथे देत आहे.. आशा आहे तुम्हालाही आवडेल आणि तुमच्या कडे काहि ओळी असतील तर त्या कमेंट्स मध्ये टाका..

    _____________________________________________________

    हे...हेच बदल म्हणजे जीवन असेल तर कशाकरता
    जगायचं ते? पतंग आपला फाटतोय...गोते खातोय...त्याला खाली
    हापसायचा.ठिगळं लावून पुन्हा उडवायचा. मध्येच मांजा तुटला की
    सारी पोरं पतंग धरायला 'है॓sss' करुन धावतात.जिवाच्या
    आकांतानं आपणही त्यांच्या बरोबर दमबाजी करीत पळायचं.
    'एssसो ss ड...सोड!भैं...द!हात तोडून टाकीन!' म्हणत पतंग
    पुन्हा पकडायचा. गरम छातीनं, पेटके आलेल्या पोटयांनी
    परत जागेवर यायचं-तुटलेल्या मांज्याला पक्क्या गाठी
    मारायच्या...
    पुन्हा पतंग आपला आकाशात!
    का रे बाबा एवढा सोस?
    तर फाटका,ठिगळं लावलेला...कसाही का
    असेना...आमचा पतंगही आकाशात उडतो आहे!...देख!
    तिच्यायला! त्यापेक्षा ठिगळांसकट, गाठींच्या मांज्या-
    सकट, त्या पतंगाची जाळून राख करुन, द्या चिमूट-चिमूट
    सगळ्या धावणायांच्या हातात !...खा प्रसाद म्हणून. नाही तर,
    लावा कपाळाला अन्‌ नाचा...आकाशात फडफडायला
    दुसया एखाद्या डौलदार पतंगाला जागा झाली म्हणून!...

    ...'दुनियादारी'
    _______________________________________________

    ...'असीम'
    'वर्षा--'
    'आवाज चढवू नकोस कौस्तुभ, हे तुझं किंवा माझं घर
    नाही--रस्ता आहे!तुला आठवतं-त्या दिवशी मी
    तुला जाणीवपूर्वक प्रश्न विचारला होता,की कौस्तुभ
    या भूमिकेसाठी इत्क्या कसलेल्या नट्या तुझ्या ओळखीत
    पडलेल्या असताना तू माझी क निवड केलीस? तर तू
    उत्तर दिलं होतंस-तू हे सगळं खरं मानणार नाहीस,
    म्हणून!तुझी खरोखरची पत्नी व्हायची इच्छा
    होती माझी;तुला मी काही तासांसाठी-- कोणाची
    तरी फसवणूक करण्यासाठी पत्नी म्हणून हवी होते!
    तुझ्या नावानं गळ्यांत मंगळ्सूत्र घालावं,एवढंच
    महत्त्वाचं स्वप्न होतं माझं. देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं
    तुझ्याबरोबर सात जन्म संसार करायला मी वचनबद्ध
    व्हायला तयार असताना तू मला खोटं मंगळ्सूत्र
    घालशील का म्हणून विचारत होतास!'
    बोलताना तिचा गळा दाटून आला. डोळे
    भरून आले.
    _____________________________________________

    ...'सॉरी , सर...!'
    'चिअर्स-!'
    तिनं ग्लास ओठाला लावला.वास घेऊन पुन्हा बाजूला केला.
    त्याच्या आशा ठिसूळल्या.
    'का, काय झालं?'
    'डो'न्ट वरी.मी हा ग्लास संपवणार आहे मिस्टर टंडन.' ती
    गंभीरपणे म्हणाली,'कारण,तुम्ही मला इथे कशाकरता
    बोलावलंय्‌ याची मला पूर्ण कल्पना आहे!जे घडेल, ते
    बेहोशीत घडून जावं...शुद्धीवर आल्यावर त्याची जाणीवही
    राहू नये, म्हणून तरी मला हा ग्लास संपवलाच पाहिजे.पण
    शुद्धीत असताना मी काय सांगते ऐकून ठेवा.माझ्या
    किरणला आज नोकरीची गरज नसती तर...थोड्या वेळानं
    जो देह तुम्ही विवस्त्र पाहणार आहात मनसोक्त उपभोगणार
    आहात...त्या देहाचं नखसुद्धा तुमच्या दृष्टीस पडलं नसतं!
    पण माझ्या दुर्दैवानं,दान तुमच्या बाजूचं आहे.त्याला
    नोकरीची नितान्त आवश्यकता आहे. म्हणूनच आजच्या
    रात्रीपुरता हा देह तुमच्या स्वाधीन करणार आहे!'
    असं म्हणून तिनं ग्लास तोंडाला लावला.गटागट पिऊन
    टाकला
    तो आवाक्‌!त्याच्या हातातला ग्लास तसाच.
    'घ्या मिस्टर... घ्या !अपराधाची बोचणी लागून मजा
    किरकिरा होणार नाही म्हणजे!'
    त्यानं निमूटपणे ग्लास उचलला.संपवला.
    ______________________________________________

    ...'न्याय-अन्याय'तपासाची सूत्रं अशोक फडकरच्या हाती जायला नको होती!डिपार्टमेंटचा
    हा एक माणूस टेरर आहे. नसलेलं सूत निर्माण करून,त्या वरुन स्वर्ग
    गाठण्यात त्याचा हात कोण धरणार नाही!
    आणि पोलिस आहे का कोण हो! साला औषधाला पैसा खाईल तर शपथ!
    -हे फार वाईट!
    म्हणजे, हा या ना त्या प्रकारे योग्य मार्गाने माझ्यापर्यंत पोहोचला,तर...!
    दिवाभीतीचं आयुष्य-या शब्दाचा अर्थ मला तेव्हा खर्‍या अर्थाने कळला!
    दारावरची बेल वाजली की,माझे हात-पाय गळायचे!कामाच्या ठिकाणी कोणी
    हाक मारली की,खपकन्‌ हृदय बंद पडायचं!
    माझं नशीबच थोर,म्हणून या काळात माझी न्‌ फडकरची कुठे समोरासमोर
    गाठ पडली नाही!
    तरंगिणी गेली...ऐन तारुण्यात गेली....अशा प्रकारे गेली...तिच्या मृत्यूला
    आपणच जबाबदार आहोत.
    सगळं मला मान्य होतं.झाल्या प्रकाराबद्दल मला दु:ख वाटत होतं.मन:पूर्वक
    पश्चातापही होत होता.
    पण असा विचार करा-मी काही कोणी सराईत खूनी नाही.सायकिक तर त्याहून नाही.
    किंबहुना,गुन्हेगारी प्रवृत्तीबद्दल मला स्वत:लाच चीड आहे.मग,मी न सापडल्याने,एक
    मोठा गुन्हेगार मोकला रहातो,अशातला भाग नाही,हे तुम्हीही मान्य कराल.कसं घडलं
    ते मी तुम्हाला हातचं काहीही न राखता सांगितलंच आहे.
    तरंगिणी तर गेली.आता,मी माझे प्राण वाचवायला प्रयत्न केला तर,त्यात चूक
    काय आहे?
    हा मुद्दा लक्षात येताच, माझं डोकं विचार करायला लागलं.
    फडकर कसा तपास करतो-त्याला काय मिळतं...नुसतं पाहात बसून चालणार नाहीये!
    पुराव्याअभावी पोलिसांनी केस फाईल केली तरी डोक्यावर आयुष्यभर टांगती तलवार राहिल!
    त्यापेक्षा,आपणच फडकरला आपल्या दृष्टीनं सुरक्षित अशी शोधाची दिशा दिली पाहिजे.
    खटला निकाली झाला पाहिजे!
    दोन दिवस मी त्याच विचारात होतो.आणि तिसर्‍या दिवशी माझ्या विचारांना दिशा
    मिळाली.
    तो-एल्‌.आय्‌.सी.डेव्हलपमेंट ऑफिसर!
    काही इलाज नाही! तो या प्रकरणा संदर्भात तरी इनोसन्ट आहे,हे मला माहित आहे.
    पण,माझी मान निश्चित्पणे वाचवायची असेल तर,त्याची पक्की अडकणं आवश्यक आहे!
    निर्णय घेताना मला वाईट वाटलं खरं;पण शेवटी...
    न्याय-अन्याय...सगळ्या टर्मस्‌ सापेक्षच की!
    __________________________________________________

    दुनीयादारी
    तुझं प्रेम हे आकाशाइतकंच खरं नि सर्वव्यापी आहे रीन जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी आपण आकाशाच अस्तीत्व नकारु शकत नाही पण रीन, म्हणुन कोणी आकाशाखालीच निवारा शोधत नाही! त्यासाठी घराच्या अस्तित्वाची गरजही तितकीच प्रखर असते! तु माझ आकाश आहेस श्रध्दा माझा निवारा आहे! मी तुझं आकाश आहे; धीरुभाई तुझा निवारा आहे आकाशानं आकाशाइतकचं भव्य राहावं रीन त्यानं कोणाच्या निवाऱ्याचं छप्पर हो उ नये!

    __________________________________________________

    'क्षितिज'
    माफ करा विश्वासदा!तुम्ही दिलेलं हे बक्षीस मी आजपर्यंत अभिमानाने जपलं
    कसेही प्रसंग आले तरी ते काधून टाकण्याचा विचारही माझ्या मनात डोकावला नाही.पण...
    आज मी ही सिगारेट-केस लायटरसह विकू इच्छितो!
    सारं जग-विश्वाचे सारे मानवी व्यवहार भाकरीच्या एका चतकोरात सामावतात,हे
    आज मला पटलं.तुम्हाला पटलं तर तुम्हीही मला माफ कराल!
    तुम्ही उत्स्फूर्तपणे दिलेली ही छोटीशी भेट विश्वासदा,या भेटीच्या
    रुपानं एकदा सारं विश्व मुठीत बंदिस्त झालं होतं.सारी इन्डस्ट्री तेव्हा पायाशी असल्यासारखं
    वाटलं होतं.भविष्याच्या स्वच्छ निळ्याभोर आकाशात एक सप्तरंगी क्षितिज-रेषा दृष्टीपथात
    आली होती.पौर्निमेचा उगवता चंद्र असा$ हात लांब करुन हातात घेण्याइतका सहजप्राप्य
    वाटावा,तशी ही क्षितिज-रेषा चार पावलांवर भासत होती.या रंगीत क्षितिजावर एक
    दिमाखदार,टप्पोरा तारा स्वयंतेजाने तळपत होता.कीर्ती...पैसा...मानसन्मान...असे त्याचे
    कितीतरी पैलू नजरेच्या टप्प्यात होते.वाटलं होतं, या क्षितिज-रेषेपाशी लवकरच आपल्याला
    पोचायचं आहे.मग तो उगवता तारा हळूच स्वत:हून खुडला जाईल.आपल्या माथ्यावर विराजमान होईल.
    आता मला कळलं आहे विश्वासदा;
    तुम्हाला कळलं आहे का?
    कोणत्याही अतृप्त कलावंताची अधाशी नजर अशाच एका क्षितिज-रेषेवर खिळलेली अस्ते.
    या रेषेवर एक तारा अस्तो.
    या तार्‍याचं प्रतिनिधीक रूप म्हणजेच कलेतला आपला आदर्श.
    या आदर्शांपर्यंत पोहोचणं,हेच आपल्या कला-जीवनाचं ध्येय.सांगता.
    हा तारा हासिल करण्यासाठीच कलाकार तन-मन-प्राण पणाला लावून आयुष्यभर
    झिजतो,कष्ट घेतो.पावलाला शेकडों जन्मांची तपश्चर्या करीत या क्षितिज-रेषेकडे सरकत राहातो.
    आणि...
    क्षितिज हाती लागत नाही;
    तार्‍याची जागा सापडते,तर ताराही पुढे सरकलेला!
    किती चमत्कारीक आहे हे विश्वासदा!
    या तार्‍याची नजरही दूर कुठेतरी स्थिरावलेली असते.त्याच्या नजरेसमोरही,
    त्याच्यापुरती दिसणारी अशी एक क्षितिज-रेषा असते.तिथेही एक दैदिप्यमान तारा लखलखत
    असतो.आणि ती जागा मिळत नाही म्हणून आपला तारा असमाधानी असतो.दु:खी असतो.
    कष्टी असतो.उदास असतो.
    प्रत्येक कलाकाराचं क्षितिज असं त्याच्या दृष्टीपथात;
    हाती मात्र येत नाही!
    ____________________________________________________

    ’स्वीकृत’
    ’का गं झोप नाही लागत का?’
    प्रश्न उत्तर देण्यासाठी नव्हताच. नि:शब्दपणे ती त्याच्या शेजारी येऊन बसली. सिगारेटचा देखणेपणा ऐटीत जळत तिचं पार थोटूक होईपर्यंत ती पहात राहिली. मग त्यानं ते थोटूक रस्त्यावर उडवलं.रस्त्याच्या मध्यावर पडून ते रागावल्यासारखं भकभकत राहिलं. धुराची एक अशक्त रेषा सरसरत राहिली.
    हेच माणसाचं जीवन. आयुष्यभर असं जळत राह्यचं...नाहीतर विझून राख होऊन जायचं! मागे सिलकीत काहीच नाही शेवटी!
    मी कोण, कोठुनि, कशास्तव येथ आलो?
    ही इंद्रिये धरुनि सज्ज कशास झालो?
    कर्तव्य काय मज येथ करावयाचे?
    -मेल्यावरी तरि कुठे, मज जावयाचे?
    ...कोण?
    कशासच उत्तर नाही आपल्यापाशी. अगदी प्राथमिकसुद्धा!
    एका स्त्रीच्या आणि वासनेतून...त्यांच्या कामक्रिडेचं फळ म्हणून...त्यांची इच्छा म्हणून जन्माला आलो. कोणाच्या न कोणाच्या आधारे जळत...जाळत मोठा झालो.का? कशाकरता?
    ...डोन्ट’ट नो!
    एका स्त्रीला य:कश्चित गर्भ देऊ शकत नाही आपण... या प्रश्नांच्या अंतापर्यंत काय पोहोचणार?

    ____________________________________________________

    सूत्रबद्ध्
    एकदा सम्बध येन्यापूर्वी,तो येऊ न देण माणसाच्या हातात असत. एकदा सम्बध आला की,'आपण एकमेकांची ओळख विसरुन जाऊ! हेही चालत नाही! एकदा माणूस कळला की आपल्या किंवा त्याच्या अंतापर्यंत तो असतोच!

    ____________________________________________________

    ’काळंबेरं’
    आत...आत,जंगल-गाभ्यात खोल...खोल शिरत...
    अखेर मी त्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलो होतो!
    वृक्षतोड करुन,सोयीनं तयार करुन घेतलेलं मैदान.त्यात,आपली कबर कोणती,ते मृतालाही आता ठामपणे सांगता येणार नाही,इतक्या त्या मेलेल्या...पडझड झालेल्या...रंगावर धुळीचे लोट बसलेल्या...स्वत:ची ओळख हरवून बसलेल्या कबरी...
    आणि,एक चबुतरा!तो मात्र तुकतुकीत,स्वच्छ!
    कबरी तशा फारशा नव्हत्या.’किती आहेत?’असं मनाशी विचारत,मी पुढे येताना त्या मोजूनही टाकल्या!
    एक...दोन...ती चौथी...सहा...सात...दहा!
    दहा!
    हा आकडा कबरींच्या संदर्भात मला परिचयाचा वाटला.जणू,कबरी म्हटलं की,त्या एका जागी दह-दहाच्या बंचमधेच असणार!
    मग,अगदी अचानकपणे,या ’दहा’चा संदर्भ लागला;आणि मी नखशिखान्त शहारलो.
    दहा!अली-बंधू अकराजण होते.पैकी,सादिक एकटा जिवंत आहे!
    दहा भावांच्या दहा कबरी!
    आणि... हा चबुतरा राखीव-अकराव्या कबरीसाठी?
    या क्षणी तो संपूर्ण रिकामा होता;पण चबुतर्‍याचे संदर्भच बदलल्याने,मला त्याच्याकडे पाहताना शहारल्यासारखं होत होतं.
    एक-एक जड पाऊल पुढे नेटानं रेटत,मी चबुतर्‍याच्या जवळ आलो.सूचना फीड केलेल्या यंत्रमानवासारखा माझा हात आपोआप माझ्या खिशाच्या दिशेनं गेला.तो अंगारा काधून या चबुतरा-
    खलास!
    विंचवानं नांगी मारल्यासारखा हात खिशातून बाहेर!
    त्याच वेळी,अज्ञातातून कोणीतरी खुद्‌कन्‌ टिंगलखोरपणे हसलं!
    ओह!काय स्थिती झाली असेल माझी!
    ज्या अंगार्‍याच्या जिवावर रुबाब करीत,इथपर्यंत येणुआचं धाडस केलं होतं,ती अंगार्‍याची पुडी होती कुठं-?
    पाण्यात पडलो, तेव्हाच ती भिजून फाटली होती!
    -आता?
    क्षणार्धात्‌,मनानं विद्युतवेगानं सूचना केल्या.शरीरानं त्या तंतोतंत पाळल्या.खिशात हात घालून मी तो उलटा केला. खिशातला लगदा हाती येताच,तो चबुअतर्‍यावर भिरकावला. चारी दिशांना फुंकणं आता विसरा!
    दुसर्‍या क्षणी मी चबुतर्‍याकडे पाठ वळवून पळत सुतलो!
    इतकं सगळं झालं;पण हातातली ’देवकाठी’ मात्र मी सोडली नव्हती!
    ______________________________________________________

    'लटकंती'
    धनमच भूमौ, पशवश्य गोष्ठे! कांता गृहदरारे जनम स्मशाने !!
    देहाश्यितायम परम्लोके ! कर्मानूगो गच्यान्ती, जीव एक !!"

    म्हणजे, आताच्या पध्तीनूसार,
    धन सम्पत्ती घरातल्या सेफ मध्ये नाहीतर बैंकयेच्य खात्यात राहाते पशु पक्षी प्राणीही जागच्या जागी रहातात खुद्द आपण जीला अर्धांगिनी म्हणतो ती आपली पत्निही पूर्नात्वाने घराच्या दरवाज्या परेन्त सोबत येते. नातेवैक मीत्र वगैरे स्मशाना परेन्त सोबत येतात. आपला अत्यनत खासगी मालकीचा देह चितेवर आपल्याला सोडून पंच्तात्वात विलीन . मग यातल नेमक आपल काय?
    तर काही नाही
    काहीच नाही.
    कशासाठी साम्भालायाच मग हे?
    त्या कोना पर्मेस्वराचा एक काल्पनिक खेल चालू रहावा म्हणून?
    गाड्गवाच्या G त जा ना, साला, मला काय देन-घेण या तुझ्या खेलाशी?
    मी या शनी हे आयुष्य संपवायला तैयार आहे!
    आईशपत,
    हे असच घद्धानार आहे, याची त्या शनी मला कल्पना नव्हती हो!

    __________________________________________________

    आशिष कुलकर्णी..

    Suhas Shirvalkar, SuShi, Marathi Lekhak

    2 Comments:

    Blogger Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

    आणखी एक जबरदस्त सु.शि. फॅन की काय? बरं वाटलं भेटून!

    September 22, 2009 at 5:50 PM  
    Anonymous Anonymous said...

    June diwas aathwale mitra...collegemadhe astana duniyadarichi parayane kelit re..punha mitra bhetlyawar kadambari kunachi kiti paath zali te mhanun dakhwayacho...sushi sarkha lekhak honar nahi... tu mhatala te barobar aahe...libraritun pustak aanyche phakta sushinche....wachayche phakta sushinche....wede hoto re sagale...
    sushi gele tevha maitrinine phone karun sangitale sanganyapurvi radat hoti mala watle tichya gharatale konitari gele nantar kalalyawar doghehi radat hotore....ticha maza sushinchyabarobabar photo aahe
    dhanyawad

    April 26, 2010 at 7:06 PM  

    Post a Comment

    Feel free to type your comments here

    Subscribe to Post Comments [Atom]

     



    स्वतःचा ’ईमेल’ नोंदवा व मोफ़त अपडेट्स मिळवा.
     
    SMS Alerts: मोफ़त माहिती मिळवा मोबाईल वर.

    ओळख ब्लॉगरशी.

    आशिष कुलकर्णी, महाराष्ट्र माझा हा ब्लॉग २००३ साली सुरु केला. मी संगणक व्यवस्थापन या विषया मध्ये उच्च शिक्षण घेतलेले आहे. माझ्या समाजकारण आणि राजकारण यांच्या आवडिपोटी चालु केलेला हा ब्लॉग आपल्या पसंतीस पडेल हिच आशा ठेवतो.


    Follow Ashish Kulkarni on twitter


    सेन्सेक्स चे आकडे (LIVE)
    BSE

    Graph

    NSE
    Graph
    सौजन्य: economictimes.com indiainfoline.com

    ताज्या बातम्या / Latest News






    © Ashish, Some Article can not be copied by any means without written permission.
    Life in BPO | Orkut Fun