We have moved, please visit
www.MaharashtraMajha.com

 
  माझ्या महाराष्ट्राचा माझा ब्लॉग ..महाराष्ट्र माझा..  
 

!! महाराष्ट्र माझा !!
               साम । दाम । दंड । भेद

 

Make HomePage | Bookmark this site! | Know Your IP



हेही वाचाच..
  • बाळ केशव ठाकरे.
  • मागिल काहि महिन्यातील लेख.


    Advertisement:
    SMS- JOIN MYSHIVSENA to 567673434 & become a proud member of ShivSena's SMS Group.


    आणखि काहि लिंक्स..
    लाईफ़ इन बीपीओ..
    ऑर्कुट मज्जा...
    या ग्रुप मध्ये सामिल व्हा.

    Enter your email address:

    Delivered by FeedBurner


    Tuesday, January 29, 2008

    नमस्कार मित्रांनो. माझ्या ब्लॉग ला दिवसागणिज प्रतिसाद वाढतच चाललाय आणि त्याच प्रमाणे माझे मराठि टंकलेखन हि सुधारु लागलय. सगळी तुमचीच कृपा.

    नुकतेच माझ्या गावाकडे चांगली महिनाभर सुट्टि घालवुन आलो आणि साहित्य-संमेलन हि घराशेजारिच भरले होते त्याचा हि आस्वाद घेतला आता आलोय परत.
    रेल्वे स्टेशन च्या बाहेर आलो आणि पहिला विचार मनात आला तो म्हणजे च्यायला का परत पुण्याला आलो हा. पुण्यात येण्या अगोदर प्रत्येकाला वाटते मि पुण्याला चाललो "किती छान". पण सहा एक महिन्यात माणुस येतो लाईनीवर. आणि बर्याच जणांना फ़ोन वर हेच सांगतो.."पुण्यात काय मजा नाही राव, नुसते गाडिंचे आवाज त्या ट्राफ़िक ची कटकट." ज्याला ट्राफ़िक ची कटकट हि अतिशोयक्ती वाटते त्याने पुण्यात गाडि चालवुनच बघावी.

    पुण्यातले रस्ते हा बातम्यांचा विषय होता. खड्यात रस्ता म्हणजे काय हे पाहण्या साठि खास अभ्यास सहली येऊन गेल्या..असे म्हणे बाबा. खास पाठिचे आणि हाडांचे विकार यावर चर्चासत्रे घेउन काहि लोकांनी आपल्या स्वताःच्या म्हातारपणाची तरतुद करुन ठेवली. नुसते पेपर मधुन लेख आणि फ़ोटो येत होते कॉमन-मॅन मात्र ढिम्मं. घेतोय रोज आपलीच .. शेकुन.
    पण हां आता परिस्थिती चांगली नसली तरी बरि आहे. लाजे खातर का होइना पण रस्ते केलेत डांबरी. पण आता नविनच टुम निघालीए रस्ते कॉंक्रिटीकरणाची. रस्ते कॉंक्रिट चे करणार आहेत. करा चांगलच आहे पण (च्यायला हा ’पण’ दर वेळि येतोच) गावातले सगळे रस्ते एकदमच खणायचे? पुण्यात गल्लो-गल्ली तुम्हाला दिसतील ते म्हणजे ’खुदा हुआ रस्ता और टुटा हुआ दिल’..जाउदे ते दिल वगैर भानगडित आपण आत्ता पडायला नको. आणि आहेत तेहि रस्ते किती पुरतात? नुसत्या एकमेकाला चिकटवुन गाडि चालवायला जमत नाही म्हणुन अंतर ठेवल्या सारखे करायचे. ते ’पी.एम.टी’ चे ड्रायवर तर रिटायरमेंट नंतर नक्किच सर्कस मध्ये जाउन त्या लोकांना ’सर्कशीत गाडि कशी चालवावी’ हे शिकवत असणार.
    बाईक वाले तर अगदि धुम-मचाले-धुम. आणि खास करुन ’त्याच्या’ मागे जर ’ती’ बसली असेल तर विचारयलाच नको. या जोड्यांचा वेग बघुन हि पळुन जाऊन लग्न वगैर करायच्या बेतात आहेत कि काय अशी शंका मनात उगीचच डोकाउन जाते. सिग्नलचा लाल दिवा तर रिक्शा वाल्यांसाठी थट्टेचाच विषय. रस्त्याच्या कडेला लोके थांबवुन ठेवलेली असतात आणि मंत्र्यांचा ताफ़ा वेगाने निघुन जातो कदाचित हा मंत्रीपणाचा फ़िल मिळवण्यासाठि सगळि लोकं सिग्नलला थांबलेली असताना रिक्शा वाले मात्र आपला ताफ़ा घेउन भुर्रदिशी निघुन जातात. नुसती वाट लागलीए रसत्यांची. मुले, वृद्ध लोके रस्ता ओलांडणार कसा याचा विचार वेळेच्या कमतरते अभावी केला नसाव.

    रोज शेकड्याने नविन गाड्या रस्त्यावर येतायत. कारण एकच बस मध्ये जागा नाहि आणि पाहिजेल तेंव्हा पुर्ण बसच नाहि. एकदा डेक्कन-वारजे हि बस संध्याकाळि रस्त्या वरुन जाताना पहावी. हि बस एवढे लोकं घेउन पुढे जाऊ शकते.... हे बघुन बस बनवणार्या टाटांचे हि डोळे पांढरे होतील, हि अवस्था. कोण आपल्या गाड्या सोडुन बसनं जायचा विचार करणार?

    घराचे बोलावे तर एवढ्याश्या जागेला हेऽऽऽऽ एवढे भाडे त्यात आणि डिपॉसीट नावाची किमान २० ते २५ हजाराची लबाडी. घरांची भाडी अगदी अव्वाच्या सव्वा करुन ठेवलियेत. याला सर्वात जास्त जवाबदार आहेत घरांचे दलाल (Oh! pls call us brokers..u know na). एकेक दोनदोन महिन्यांची भाडि घेतात दलाली म्हणुण आणि ति जास्त मिळावि म्हणुन भाडे हि काहिहि सांगतात. योग्य वेळि कोण अडवले नाहि म्हणुन आता यांनी केलय गरिबांना आडवं. रहायचं कुठे एखाद्या गरिबानं? फ़्लॅट चे रेट तर केंव्हाच गेलेत ऊच्च मध्यमवर्गीयांच्या आवाक्यातुन हि बाहेर. बर बाबा हे एवढे पैसे भरतो म्हणुन काहि सुविधा...... काहि नाही. रंग उडालेल्या भिंती मनाचे थरकाप उडवणारे छत. यात सगळ्यात जास्त हाल होतात म्हणजे विद्यार्थ्यांचे. याना आय.टी इन्जिनीअर इतका पगार नाही हि गोष्ट समजुन घ्यायला नको? कशाला घेउ समजाउन तु नही तो और कोइ, पण भाडे एवढेच राहणार. ज्या प्रमाणे पैसा नाहि म्हणुन मुम्बापुरितुन मराठी माणुस बाहेर तसेच पुणे मध्यवर्ती शहरातुन विद्यार्थी बाहेर. या जागेचा प्रश्न निर्माण झालाय कारण बाहेरुन कामासाठी येणारे लोकं. या आय.टी उद्योगा मध्ये इतके जॉब्स आहेत कि बस्स म्हणायची वेळ यावी. कॉलेज झाल्याझाल्या कॉल सेन्टर मधुन १२-१५ हजार मिळुलागतात, मग कोण कश्याला थांबतो आपल्या गावाला? जॉब्स मिळतायत फ़ार चांगले पण फ़क्त पुण्यातच का? बाहेर का कंपन्या नेत नाही तुम्ही? या कंपन्य़ांच्या गर्दी मुळे आणि असणार्या दांडग्या पगारामुळे महागाई रोजच वाढतीए. एक दिवस असा येईल कि पुण्यात फ़क्त दोनच प्रकारची लोके असतील एक म्हणजे एवढ्या महागाइत टिकुन राहणारे आय.टी इन्जिनिअर्स आणि यांच्या घरात झाडु-स्वंयमपाक करणारी कामगार मंडळि....बाकिच्यानी सामान उचलावे आणि जावे कुठल्या तरी स्वस्त शहरात.

    भलेहि मालाला भाव नाहि म्हणुण शेतकरी आत्महत्या करो पण तोच भाजी-माल पुण्यात जरा स्वस्त मिळाला तर शप्पथ. या आय.टी वाल्याना आहे पगार भरपुर म्हणुन काहिहि भाव सांगायचे आणि त्यानी घ्यायचे. या आय.टी वाल्यानमुळे नॉन-आय.टी वाल्यांच जाम अवघडुन बसलय. सगळच महाग होऊन बसलय.

    या वाढणार्या गर्दी मुळे शहराला अगदी बकालपण यायला लागलाय़ आणि शहरात आणि शहरा बाहेर झोपड्पट्ट्या हि वाढु लागल्यात. झोपडपट्ट्या आणि शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण हे समप्रमाणात वाढतात हे सांगायला एखाद्या सत्यशोधन समितीच्या निष्कर्श येण्याची वाट पाहण्याची गरज नाही.

    गावात मॉल तर अनेक. बर हे मॉल्स नेहमी गावाबाहेर कमी गर्दीच्या ठिकाणी असावेत हे साधे लॉजिक मात्र गोर्यांकडुन उचलायला इथली लोके विसरलीत. भर शहरात मॉल्स. एखादा सेल निघाला कि लागली वाट. गाडी चालवणे हे अवघड काम. आणि हे मॉल्स गर्दी जमवुन अपापले शक्ती-प्रदर्शन तर महिन्यातुन किमान चार वेळा करतात. बर बाबा येउदेत मॉल्स येउदेत भरवस्तीतच भलेही कितीही शहराचा श्वास कोंडुदे. पण याच पुणे शहरात कितीतरी एतिहासिक स्मारके आहेत..त्यांची काळजी घेता काओ या मॉल्स एवढी. शनिवार-वाडा पहायला या एकदा काय मान या वास्तुला दिलाय तो बघा. माणुस किती हि आधुनिक होऊदे पण ज्याला आपल्या इतिहासाचा मान नाही सन्मान नाहि त्याची वृध्दी कधिच नाहि होऊ शकणार. तो असेल फ़क्त फ़ुगवटा वाढ म्हणुन काहि नसणार. इतिहासाला ऐतिहासिक वास्तुंना त्यांचा वाटेचा मान-सन्मान मिळालाच पाहिजे.

    तो कोण मिळवुन देणार? कोण सोडवणार शहराचे किमान प्राथमिक प्रश्न?
    आहेत नगरसेवक इथेहि आहेत. पण इथे महानगरपालिका म्हणजे नुसता शाब्दिक खडाजंगीचा अड्डा. निर्णय कमी वादच जास्त.

    हे बदलावेच लागणार. आता तरी ज्यांना खरच काही कळतय बाबा अश्या लोकांना राजकारणात उतरावे लागणार. समाजकारणाचा मार्ग राजकारणातुन न्यावाच लागणार नव्हे तो आपण मिळुन न्ह्यायचाच. नाहि तर एक वेळ अशी येइल कि कोणि किती हि प्रयत्न करो या पुण्याचे नवनिर्माण मात्र काहि होणार नाहि. ज्या मातित तानाजीने उदयभानाच्या हाततुन सिंहगड झिंकला त्याच मातित आता या उणिवांवर मात करुन त्यांच्या वर विजय मिळवायचा आहे. आणि हे बळ आहे केवळ केवळ आणि केवळ तुझ्याच मनगटात.

    पुणे तिथे काय उणे..हि घ्या यादि.
    १. रस्ते.
    २. दळण-वळण.
    ३. बकाळ पणा.
    ४. जागेचा प्रश्न.
    ५. बाहेरुन येणारे लोंढे.
    ६. झोपड्पट्ट्या.
    ७. मॉल संस्क्रुती.
    ८. एतिहासिक स्थळे.
    ९. विद्यार्थ्यांचा राहण्याचा प्रश्न.
    १०. मुळावरच ऊठलेला आय.टी उद्योग.
    ११. पाणि-निचरा.
    १२. वाढते नव्हे वाढलेले प्रदुषण.
    १३. खास पुण्याची महागाई.
    १४. महापालिकेचे अप्रशिक्षीत कामगार.
    १५. बेशिस्त रिक्षावाले.
    १६. झोपी गेलेले नागरिक.
    १७. कुस्ती मैदान "महानगरपालिका".
    १८. आणि बरेच काही.


    !! जय महाराष्ट्र !!
    अशिष कुलकर्णी.

    तुमच्या भावना कमेंन्ट्स मधुन नोंदवा.

    Read more! / पुढे वाचा..


    Friday, January 11, 2008

    संत ’गुगल’बाबा ऑर्कुट स्वच्छ्ता अभियान.

    नमस्कार..
    ऑर्कुट हे नाव जो कोणी हि नेट वापरत असेल त्याला माहितच आहे. तुम्ही हि या ब्लॉग वर कदाचित ऑर्कुटवरुनच आला असाल. या ऑर्कुट मुळे अनेक म्हणजे हजारो लाखो मित्र एकमेकांना अनेक वर्षांनन्तर भेटली आहेत. आहेत या ऑर्कुट चे अनेक फ़ायदे आहेत. हे नाकारुन चालणार नाही. पण याच ऑर्कुट मुळे अनेकदा अनेक दंगे हि झाले आहेत.

    आज आपण कॉलेज मध्ये एकत्र शिकत असतो..उद्या? प्रत्येकच्या वाटा वेगळ्या. प्रत्येकाला फ़ोन करणे होइलच असे नाही आणि ते परवडेल असे हि नाही. मग अश्या वेळी काय़? तर ऑर्कुट. अनेक मित्र भेटतात, अनेक मित्र बनतात. माझेच कितीतरी नवीन मित्र या ऑर्कुट मुळे झालेले आहेत. अनेक कम्युनीटीज आहेत इथे. ज्याची जशी आवड त्या प्रमाणे त्याने ती जॉईन करावी. पण जे चांगले त्याच्यातुन मी काहितरी वाईट करणारच.....हि अशी विकृत मनोवृत्तीची लोके हि या ऑर्कुटवरच आहेत.

    एखाद्याच्या भावनेशी खेळने आणि तेहि आपली ओळख लपवुन हे काम इथे फ़ारच सोपे आहे. याच ऑर्कुटवर आपल्या देशाचा, आपल्या शिवरायाचा अपमान केला जातो. बाळासाहेब ठाकरें बद्दल काहि हि लिहले जाते. हि लोके आहेत तरी कोण हो? हि आहेत दळभद्रि लोके ज्याना एखादे चांगले बघवतच नाही. हि असतात विकृत मनोवृत्तीची लोकें. यांना पकडणे शक्य आहे? आहे पण फ़ारच अवघड आहे ते.

    मग यांना ऑर्कुट नावाचे मैदान मोकळेच आहे का? कि या काय करायचे ते करा..या आमच्या देशाचा, आमच्या शिवरायाचा, आमच्या साहेबांचा अपमान करा. नाहि हे असे नाही, हे असे होऊ दिले जाणार नाहि. या लोकांना हुडकणे फ़ार अवघड आहे पण याना वठणीवर आणणे काही जास्त अवघड नाहि. आणि यांना वठणीवर आणायचेच. आपण सर्वांनी मिळुन आपण यांना वठणीवर आणायचेच.
    ऑर्कुट चा एक नियम आहे. कि जर एखाद्या कम्यु्निटी अथवा युजर वर जर एक हजार युनिक युसर्सनी जर Abuse म्हणुन क्लिक केले तर ती कम्युनिटी अथवा युजर ऑर्कुट वरुन Delete करुन टाकला जातो. पण एक हजार युजर्स पर्यंत हि कम्यु्निटी ज्याला डिलीट करायचे आहे ति पोहचणार कशी, ज्यामुळे हि लोके या कम्युनिटिज वर जाऊन तिथे Abuse म्हणुन क्लिक करतील. या साठी म्हणुन केवळ एक ग्रुप स्थापन करण्यात आलेला आहे.

    काय आहे हा ग्रुप? ऑर्कुट वरिल माजलेल्यांना वटणीवर आणण्या साठी Yahoo! चा वापर करायचा. आपण सर्वांना याहू ग्रुप्स बद्दल माहितच आहे. म्हणुन याहू ला निवडलयं. एका क्लिक वर एक मेल हजारो लाखो मेम्बर्स पर्यंत पोहचतो. या ग्रुप चे नाव आहे रुल-ऑर्कुट (Rule-Orkut). हा ग्रुप तुम्हि जॉइन करायचाच पण आपल्या तमाम मित्रमंडळीस हि जॉइन करण्यास सांगा. हा ग्रुप जेंव्हा तुम्हि जॉइन कराल तेंव्हा आपणास इ-मेल येतील. काय असते या इ-मेल्स मध्ये? कोणत्याही हिरो-हिरोइन्सचे फ़ोटो नसतात तर ज्या कम्युनिटीज ना ऑर्कुट वरुन डिलीट करायचे आहे त्या कम्युनिटीज ची लिंक असते. तुम्हाला फ़क्त त्या कम्युनिटीवर जाऊन Abuse वरती क्लिक करायचे आहे. या ग्रुप मध्ये जेंव्हा १०००+ मेम्बर्स होतील तेंव्हा एखादी क्म्युनिटी जी आपल्या देशाचा, शिवरायाचा आणि बाळासाहेबांचा अपमान करतीये तीला डिलीट करणे हे केवळ काही मिनिटांचे काम असेल.
    म्हणुनच माझे असे म्हणणे आहे कि तुम्हि हा ग्रुप जॉइन कराच आणि या ग्रुप चा हेतु सफ़ल करा. हा ग्रुप जॉइन करण्या साठी खालिल लिंक वर क्लिक करा...
    http://groups.yahoo.com/groups/ruleorkut

    आता ऑर्कुटवर आलतु फ़ालतु कम्युनिटीच शिल्लक ठेवायच्याच नाहित. बघु मग कुणाच्यात एवढी ताकत आहे आपल्या एकजुटी पुढे उभे राहण्याची. आता लिहाच काहि अशे आणि तशे आमच्या हिंन्दुस्ताना बद्दल, आमच्या शिवराया बद्दल आणि आमच्या साहेबांबद्दल, आपल्या अस्मितेशी खेळणारी एक हि कम्युनिटि या ऑर्कुटवर शिल्लक राहता कामा नये. आपणालाच ऑर्कुट स्वच्छ केले पाहिजे.

    या अभियानाला म्हणुनच नाव दिले आहे: संत गुगलबाबा ऑर्कुट स्वच्छ्ता अभियान.
    Therefore to strengthen the strength Join this group now:http://groups.yahoo.com/groups/ruleorkut

    !! जय हिंन्द !!
    !! जय महाराष्ट्र !!

    Read more! / पुढे वाचा..



    स्वतःचा ’ईमेल’ नोंदवा व मोफ़त अपडेट्स मिळवा.
     
    SMS Alerts: मोफ़त माहिती मिळवा मोबाईल वर.

    ओळख ब्लॉगरशी.

    आशिष कुलकर्णी, महाराष्ट्र माझा हा ब्लॉग २००३ साली सुरु केला. मी संगणक व्यवस्थापन या विषया मध्ये उच्च शिक्षण घेतलेले आहे. माझ्या समाजकारण आणि राजकारण यांच्या आवडिपोटी चालु केलेला हा ब्लॉग आपल्या पसंतीस पडेल हिच आशा ठेवतो.


    Follow Ashish Kulkarni on twitter


    सेन्सेक्स चे आकडे (LIVE)
    BSE

    Graph

    NSE
    Graph
    सौजन्य: economictimes.com indiainfoline.com

    ताज्या बातम्या / Latest News






    © Ashish, Some Article can not be copied by any means without written permission.
    Life in BPO | Orkut Fun