We have moved, please visit
www.MaharashtraMajha.com

 
  माझ्या महाराष्ट्राचा माझा ब्लॉग ..महाराष्ट्र माझा..  
 

!! महाराष्ट्र माझा !!
               साम । दाम । दंड । भेद

 

Make HomePage | Bookmark this site! | Know Your IP



हेही वाचाच..
  • बाळ केशव ठाकरे.
  • मागिल काहि महिन्यातील लेख.


    Advertisement:
    SMS- JOIN MYSHIVSENA to 567673434 & become a proud member of ShivSena's SMS Group.


    आणखि काहि लिंक्स..
    लाईफ़ इन बीपीओ..
    ऑर्कुट मज्जा...
    या ग्रुप मध्ये सामिल व्हा.

    Enter your email address:

    Delivered by FeedBurner


    Friday, October 02, 2009

    आपण वाचनालयातुन पुस्तके आणतो आणि ती वाचायला चालु करतो ते थेट पॄष्ट क्रमांक एक पासुन. पण मी सुहास शिरवळकर यांचे पुस्तक जेंव्हा हातात घेतो तेंव्हा सुरवात करतो ती अर्पण-पत्रिकेपासुन. म्हणजे ते आपल्या इंग्रजी पुस्तकात नसते का... Dedicated to so and so.. अगदी तसेच. या अर्पण पत्रिकांचे वैशिष्ठ म्हणजे या अजिबात मोठ्या आणि लांबलचक नसतात, अगदी मोजक्या ओळित, कमी शब्दात खुप काहि बोलुन जाणार्या. अश्याच काहि अर्पण पत्रिका आपल्या साठी येथे सादर करत आहे.
    सुरवातीला पुस्तकाचे नाव दिले आहे आणि नंतर अर्पण पत्रिका.

    सु.शिं.च्या अर्पणपत्रिका...

    दुनियादारी-१
    दिग्या
    श्रेयस
    उम्या
    नितीन
    अश्क्या
    साईनाथ
    प्रीतम
    शिरीन
    मिनू
    डॅडी
    रानी माँ
    आणि
    एम्‌.के.
    ’दुनियादारी’तली ही पात्रं
    ज्यांच्यामुळे निर्माण झाली,
    त्या ’कट्टा गँग’ला-

    -सुहास शिरवळकर

    दुनियादारी -२

    ’दुनियादारी’ची ही द्वितीयावृत्ती
    त्या वाचकांना-
    ज्यांनी अक्षरश: कादंबरीची
    वीस-वीस पारायणं करुन,
    माझ्यावर पत्रांचा वर्षाव करुन,
    तिला दुसर्‍या आवृत्तीचं भाग्य
    मिळवून दिलं!


    -सुहास शिरवळकर

    दुनियादारी - ३ री आवृत्ती

    त्या सर्व वाचकांना,
    ज्यांनी 'दुनियादारी'
    विकत घेतली;
    वाचनालयातून वाचली;
    मित्राची ढापली;
    वाचनालयाची पळवली...
    पण 'दुनियादारी'वर मनापासून प्रेमच केलं!
    त्यांनाही,
    ज्यांनी 'दुनियादारी'च्या लोकप्रियतेचा मनापासून द्वेष केला!
    आणि....
    खेडं, गाव, शहर, नगर, व महानगरातील
    तमाम 'कट्टा-गँग्ज'ना,
    ज्या 'दुनियादारी' जगल्या....जगतात....जगतील!

    -सुहास शिरवळकर

    कोवळीक २ री आवृत्ती

    चार वर्षांच्या अल्पावधीत
    ज्यांनी माझ्यावर
    सहस्त्र करांनी
    अनुभवांचं विश्व उधळलं-
    त्या,
    बी.एम्‌.सी.सी. मधल्या
    समृद्ध क्षणांना!
    - रोल नं, वन-फोर-सेव्हन,
    टी.वाय्‌. 'बी'

    -सुहास शिरवळकर

    प्रतिकार ३री आवृत्ती
    मुझे इन्तजार है-
    बलात्काराच्या बातम्या होणार नाहीत...
    चर्चा होणार नाहीत...
    अशा दुर्देवी तरुणीकडे वाईट,
    संशयी नजरेनं पाहिलं जाणार नाही...
    स्त्रीच्या असाहायतेचा
    गैरफायदा घेतला जाणार नाही...
    शरमेनं समाज मान खाली घालेल...
    आणि,
    एक तरी तरुण स्वीकारासाठी
    हात पुढे करेल...
    कलम नंबर शंभरचा खरा अर्थ
    मना-मनातून रुजेल;
    त्याचे उद्‌घोष होतील...
    -वो सुबह कभी तो आएगी!

    -सुहास शिरवळकर

    समथिंग
    ही कादंबरी मी
    तुला अर्पण केलीय
    हे लक्षात येतंय,
    का आपलं....नाहीच?

    आँब्जेक्शन युवर आँनर
    सुप्रसिद्ध आंग्ल लेखक
    श्री अर्ल स्टँनले गार्डनर
    ह्यांना-
    ज्यांच्या मानसपुत्रामुळे
    अमर विश्वास
    हे पात्र निर्माण झालं

    - सुहास शिरवळकर


    शेडस्‌
    कोणत्याही चांगल्या विनोदाला
    खदखदून दाद देणाया
    आणि रहस्यकथांकडे
    गांभीर्याने पाहाणाया
    कोणाही रसिक वाचकास-

    -सु.शि.


    काळंबेरं

    माथेरानमधील तीन पावसाळी
    दिवस-रात्रींना.....

    - सुहास शिरवळकर

    मधुचंद्र

    'विश्वामित्र पाहत असताना
    'मेनके'च्या ज्या प्रथम दर्शनाने
    मला ही कल्पना सुचली,
    त्या दर्शनाला-
    अर्थात,
    'भानुप्रिया'ला ही, नि
    त्या क्षणी माझ्यासकट सर्वांचाच
    'विश्वामित्र' करणाया
    सर्व यशस्वी कला-तंत्रज्ञांनाही!

    -सुहास शिरवळकर


    हमखास

    श्री. शशिकांत अ. ठाकूर सर...
    मुख्याध्यापक म्हणून 'हिरालाल सराफ' प्रशालेतून
    निवृत्त होण्यापूर्वी,
    ज्यांना 'आदर्श शिक्षक' पुरस्कार मिळणं,
    शिक्षण-खात्याला भूषणावह ठरलं असतं;
    आणि, तो न मिळताही,
    ते 'आदर्श शिक्षक'च राहिले!
    त्यांच्या कळकळीला...सेवाव्रताला...
    आदरपूर्वक अर्पण.
    -माजी विद्यार्थी,'शिऱ्या'.

    -सुहास शिरवळकर


    ह्रुदयस्पर्श
    मीत...
    तुला-
    म्हणजे, तुला-
    म्हणजे, तुलाच
    का महितीये-?

    -सुहास शिरवळकर

    क्षणोक्षणी

    प्रत्येक कादंबरीत
    काही तरी
    आशय असलाच पाहिजे-
    असं न मानणार्‍या
    गोष्टी-वेल्हाळ
    वाचकाला-

    -सुहास शिरवळकर

    क्रमशः ...

    Read more! / पुढे वाचा..


    Monday, September 21, 2009

    हे "ट्विटर" म्हणजे काय हो?

    What is twitter, Maharashtra Majhaट्विटर? हे काय आहे? किंवा हे ट्विटर काय आहे मला समजतच नाहि.
    जेंव्हा मी ट्विटर बद्दल माझ्या मिंत्रांना किंवा परिवारातील एखाद्या सदस्याला विचारतो हि उत्तरे मला अनेक वेळा मिळतात. आणि जेंव्हा मी विचारतो कि तु ट्विटर वापरतोस का, तर त्याचे ऊतर असते कि मि का वापरु?

    ट्विटर म्हणजे 'मायक्रो-ब्लॉगींग':
    मायक्रो-ब्लॉगींग म्हणजे अतिशय कमी शब्दात आपले म्हणणे मांडणे आपल्या बद्दल अपडेट करणे. खरे म्हणजे हि तर फेसबुक ची खासियत पण याला खरे नावरूप मिळवुन दिले ते ट्विटरनेच. मला ब्लॉगींग कराय्चे आहे पण वेळ नाहिए, किंवा जास्त लिहु शकत नाहिए काळजी नको मायक्रो-ब्लॉगींग आहे ना. एक तास पुर्ण बसुन जे ब्लॉगवर एक लेख लिहु शकणार नाहित ते फक्त अपडेट देऊ शकतात जसे कि.. "आज लिहायचा कंटाळा आला आहे.. आज सुट्टी घेणार आहे" अथवा "ति मला खुपच आवडते मी काय करु?"


    या मुळे इतर लोके आपल्या बद्दल अपडेटेड राहतातच तसेस कमीत कमी शब्दात आपण आपले म्हणने हि मांडु शकतो. जसे कि आपल्या शशी थरुर साहेबांनी आपले मत मांडलेना.. इकॉनॉमी क्लासने प्रवास करणे म्हणजे "cattle class" ने प्रवास करणे.

    ट्विटर म्हणजे 'सोशल मेसेजींग':
    ट्विटर चा अपेक्षीत उपयोग म्हणजे मायक्रो-ब्लॉगींग पण तेवढ्यावर मर्यादीत न राहता आता ट्विटर म्हणजे एक सोशल मेसेजींग टुल झाले आहे. आपण ट्विटर वापरुन सर्वांपर्यंत एकच संदेश एकाच वेळी पोहचवु शकता. 'फॉलोअर्स' आणि 'फॉलो' यामुळे ट्विटर हे एक मित्रांचे जाळे म्हणुन सुद्धा वापरु शकता. बघा तुम्हि किती फॉलोअर्स मिळवु शकता ते.

    ट्विटर म्हणजे बातमीदारः

    कोणतीहि वॄत्तवाहिनी चालू करा. खाली तुम्हाला संक्षीप्त बातम्या एका ओळित फिरताना दिसतील. तश्या संक्षीप्त बातम्या म्हणजे ट्विटर. तुम्ही अत्ता काय करत आहात? या प्रश्नाचे उत्तर फक्त देण्या ऐवजी लोकं इथे आपल्या आजुबाजुच्या घडामोडि सुद्धा नोंदवतात, जसे कि या या जागेच्या इमारतीला आग लागली. इकडे भु़कंप जाणवला इत्यादी इत्यादी. ट्विटर वापरुन एकाच वेळि अनेक जणांना बातमी पोहचवता येते. मग आपल्या भागातल्या घडामोडी पोहचवणार ना आता जगाच्या कानाकोपर्यात?

    ट्विटर म्हणजे मार्केटिंगः

    मार्केटिंग जगतात ट्विटर खुपच आवडिचे माध्यम होऊ लागले आहे. आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपला संदेश पोहचण्याचा हा अगदी स्वस्त आणि नवीन पर्याय आहे. आपल्या प्रियजनांशी संपर्कात राहण्यासाठी, हॉलीवुड्-बॉलीवुड जगतातील सितारे असोत कि थेट अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा असोत यांनी वेळोवेळी ट्विटरचा सहारा घेतला आहे.

    ट्विटर हे वेगवेगळ्या लोकांसांठी वेगवेगळा अर्थ घेऊन वापरता येते. कुणासाठी हे कुटूंबाच्या संपर्कात राहण्याचे माध्यम आहे, व्यावसायीक लोकांसाठी हे व्यवसाय वाढवण्याचे तंत्र आहे तर लेखकांसाठी आपल्या वाचकांशी जोडणारा दुवा आहे.

    मग आता तरी चालु करताय ना ट्विटर वापरणे?
    Follow ME on Twitter.

    आपलाच मित्र,
    आशिष कुलकर्णी
    Author: Ashish Kulkarni
    What is twitter? learn Twitter


    Read more! / पुढे वाचा..


    Thursday, September 17, 2009

    नमस्कार,

    Maharashtra Majha
    मझ्या मराठी प्रेमी मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांसाठी एक आंनदाची बातमी आहे. 'स्टार माझा' या मराठी वॄत्त वाहिनीने 'ब्लॉग माझा' नामक एक मराठी ब्लॉगर्स साठी स्पर्धा आयोजीत केलेली आहे. आज पर्यंत आपण BloggersChoice किंवा मायक्रोसॉफ्ट ब्लॉगस्टार या स्पर्धा पाहिल्या ऐकल्या पण मागच्या वर्षी पहिल्यांदाच स्टार माझा ने मराठी ब्लॉगर्स साठि स्पर्धा आयोजीत केली. आता या वर्षी पुन्हा हि स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. फक्त ब्लॉगींग करु नका तर आपला ब्लॉग सर्वांपर्यंत पोहचवा. आणि किंवा हा ब्लॉग हा सगळ्यात भारी असे मिरवण्याची संधीच आलिए म्हणाना.

    काय करावे लागेल या स्पर्धेत सहभागी होण्याकरता? आपण आपल्या ब्लॉग ची लिंक blogmajha@starnews.co.in या ईमेल वर कळवा. सोबत आपले नाव, पत्ता, व्यवसाय, दूरध्वनी क्र, मोबाईल क्र, व ई-मेल द्यावा. ई-मेल अँड्रेस देणं अनिवार्य आहे.

    स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काहि अटी:


    १. ब्लॉग मराठीतच लिहिलेला हवा (देवनागरी unicode)
    २. अठरा वर्षांपुढील कुणीही या स्पर्धेत सहभागी होऊ शकतं
    ३. ब्लॉग पाठवण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २००९
    अधिक माहिती

    बक्षिसे-
    १. निवडलेल्या सर्वोत्कृष्ट तीन ब्लॉगर्सना प्रत्येकी प्रमाणपत्र आणि पारितोषिक देण्यात येईल.
    २. दहा उत्तेजनार्थ प्रमाणपत्रे देण्यात येतील.
    ३. विजेत्या आणि उत्तेजनार्थ ब्लॉग्जची ओळख ‘स्टार माझा’च्या एपिसोडमध्ये करून देण्यात येईल. तसेच, या ब्लॉग्जची लिंक ww.starmajha.com या वेबसाईटवरही देण्यात येईल
    ४. सर्व विजेत्यांचा सत्कार ‘स्टार माझा’च्या विशेष कार्यक्रमात करण्यात येईल.


    ब्लॉग माझा हि स्पर्धा प्रथम ३१ ऑगस्ट २००८ साली घोषीत करण्यात आली होती, या स्पर्धेची अधिक माहिती जाणुन घेण्यासाठि मी या स्पर्धेचे जनक प्रसन्न जोशी यांच्याशी संपर्क साधला आणि मिळालेल्या माहितीनुसार मागच्या वर्षी या स्पर्धेत एकुण ६० ब्लॉगर्स नी सहभाग नॉदवला होता. आणि यांच्या मधुन तीन स्पर्धक हे विजयी घोषित करण्यात आले होते. विजयी स्पर्धक निवडण्या करता कोणत्या गोष्टी पाहण्यात आल्या होत्या? तर ब्लॉग वरील उपल्ब्ध माहिती, मल्टिमेडिआ चा वापर, भाषेचा वापर, विषयाचे महत्त्व, लेख लिहिण्याची वारंवारता, तुमची ब्लॉगची आणि विषयाची मांडणी, आकर्षकता. हे सर्व मुद्दे गॄहित धरुन १० पैकी गुण देण्यात आले आणि तज्ञ लोकां मार्फत विजयी ब्लॉगर्स निवडण्यात आले.

    मागच्या वर्षीच्या स्पर्धेत पहिले तीन क्रमांक पटकावलेले ब्लॉगर्स-
    १. निमिश साने, अमेरिका-(प्रथम क्रमांक)- www.asanemanthinks.blogspot.com
    २. नंदन होडावरकर, कॅलिफोर्निया, अमेरिका-(द्वितीय)- http://marathisahitya.blogspot.com/
    ३. विश्वनाथ खांदारे, मुंबई- (तृतीय)- http://pandharpurinfo.blogspot.com/

    Maharashtra Majhaउत्तेजनार्थ-
    माधवी ठाकूरदेसाई, मुंबई- madhavithakurdesai.blogspot.com
    पराग सहस्रबुद्धये- अटलांटा, अमेरिका- parag-blog.blogspot.com
    पूनम छत्रे, पुणे- kathapournima.blogspot.com
    दिलीप बिरूटे, औरंगाबाद- dilipbirute.wordpress.com/
    सुमेधा क्षीरसागर, बेलमाँट, अमेरिका- aapula-samwad.blogspot.com/
    अभिजीत पेंढारकर, पुणे- abhipendharkar.blogspot.com/
    संदीप चित्रे, न्यू जर्सी, अमेरिका- atakmatak.blogspot.com
    धोंडोपंत आपटे, मुंबई- dhondopant.blogspot.com
    आशिष चांदोरकर, पुणे- ashishchandorkar.blogspot.com
    प्रशांत रोटवदकर, नाशिक- swatantrasamar1857cha.blogspot.com/


    ब्लॉग माझा या स्पर्धेला फक्त महाराष्ट्र / हिन्दुस्तान नव्हे तर जगाच्या निरनिराळ्या कोपर्यातुन मराठी ब्लॉगर्सनी प्रतिसाद दिला आहे, तर आता जास्त वेळ न घालवता आपला ब्लॉग या स्पर्धेसाठी पाठवा. अधिक माहिती साठी इथे क्लिक करा. मी हि आपला ब्लॉग, महाराष्ट्र माझा या स्पर्धेत पाठवत आहेच. आपणास काही ब्लॉगिंग बद्दल माहिती हवी असल्यास, काहि शंका असल्यास त्या कंमेट्स मधुन विचारा मी जरूर उत्तरे देईन.

    तुमचाच मित्र,
    आशिष कुलकर्णी
    माझ्या महाराष्ट्राचा माझा ब्लॉग महाराष्ट्र माझा...

    Star Majha Blog Comepetition, Marathi Blog Competition, Best Marathi Blogs, Blog Majha, Ashish Kulkarni, Maharashtra Majha

    Read more! / पुढे वाचा..


    Tuesday, September 01, 2009

    आपल्या म्हणी आणि या काहि "सायबर म्हणी"...

    Cyber-Mhani, Maharashtra, Majhya maharashtracha Majha Blog, Maharashtra majha.

    Read more! / पुढे वाचा..


    Saturday, August 15, 2009

    Suhas Shirwalkar, Suhas Shirwalkar Books
    सुहास शिरवळकर.. माझा आवडता लेखक.
    पुस्तके मि अनेक वाचली आहेत पण ज्या पुस्तकां मध्ये मला माझ्या आजुवाजुचे विश्व आहे तसे दिसले ती होती फ़क्त सुशिंचीच. एकदा पुस्तक हातात घेतले की ते संपुर्ण संपेपर्य़ंत खालिच ठेवु शकत नाहि अशी हि लिखाणाची अफ़लातुन शैली. वाचनालयातुन पुस्तक आणायचे आहे ना... फ़क्त एकच अट "लेखक सुहास शिरवळकर पाहिजेत" बास.. आणि काहि नको. त्याच सुहास शिरवळकरांच्या पुस्तकातील काहि मजकुर इथे देत आहे.. आशा आहे तुम्हालाही आवडेल आणि तुमच्या कडे काहि ओळी असतील तर त्या कमेंट्स मध्ये टाका..

    _____________________________________________________

    हे...हेच बदल म्हणजे जीवन असेल तर कशाकरता
    जगायचं ते? पतंग आपला फाटतोय...गोते खातोय...त्याला खाली
    हापसायचा.ठिगळं लावून पुन्हा उडवायचा. मध्येच मांजा तुटला की
    सारी पोरं पतंग धरायला 'है॓sss' करुन धावतात.जिवाच्या
    आकांतानं आपणही त्यांच्या बरोबर दमबाजी करीत पळायचं.
    'एssसो ss ड...सोड!भैं...द!हात तोडून टाकीन!' म्हणत पतंग
    पुन्हा पकडायचा. गरम छातीनं, पेटके आलेल्या पोटयांनी
    परत जागेवर यायचं-तुटलेल्या मांज्याला पक्क्या गाठी
    मारायच्या...
    पुन्हा पतंग आपला आकाशात!
    का रे बाबा एवढा सोस?
    तर फाटका,ठिगळं लावलेला...कसाही का
    असेना...आमचा पतंगही आकाशात उडतो आहे!...देख!
    तिच्यायला! त्यापेक्षा ठिगळांसकट, गाठींच्या मांज्या-
    सकट, त्या पतंगाची जाळून राख करुन, द्या चिमूट-चिमूट
    सगळ्या धावणायांच्या हातात !...खा प्रसाद म्हणून. नाही तर,
    लावा कपाळाला अन्‌ नाचा...आकाशात फडफडायला
    दुसया एखाद्या डौलदार पतंगाला जागा झाली म्हणून!...

    ...'दुनियादारी'
    _______________________________________________

    ...'असीम'
    'वर्षा--'
    'आवाज चढवू नकोस कौस्तुभ, हे तुझं किंवा माझं घर
    नाही--रस्ता आहे!तुला आठवतं-त्या दिवशी मी
    तुला जाणीवपूर्वक प्रश्न विचारला होता,की कौस्तुभ
    या भूमिकेसाठी इत्क्या कसलेल्या नट्या तुझ्या ओळखीत
    पडलेल्या असताना तू माझी क निवड केलीस? तर तू
    उत्तर दिलं होतंस-तू हे सगळं खरं मानणार नाहीस,
    म्हणून!तुझी खरोखरची पत्नी व्हायची इच्छा
    होती माझी;तुला मी काही तासांसाठी-- कोणाची
    तरी फसवणूक करण्यासाठी पत्नी म्हणून हवी होते!
    तुझ्या नावानं गळ्यांत मंगळ्सूत्र घालावं,एवढंच
    महत्त्वाचं स्वप्न होतं माझं. देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं
    तुझ्याबरोबर सात जन्म संसार करायला मी वचनबद्ध
    व्हायला तयार असताना तू मला खोटं मंगळ्सूत्र
    घालशील का म्हणून विचारत होतास!'
    बोलताना तिचा गळा दाटून आला. डोळे
    भरून आले.
    _____________________________________________

    ...'सॉरी , सर...!'
    'चिअर्स-!'
    तिनं ग्लास ओठाला लावला.वास घेऊन पुन्हा बाजूला केला.
    त्याच्या आशा ठिसूळल्या.
    'का, काय झालं?'
    'डो'न्ट वरी.मी हा ग्लास संपवणार आहे मिस्टर टंडन.' ती
    गंभीरपणे म्हणाली,'कारण,तुम्ही मला इथे कशाकरता
    बोलावलंय्‌ याची मला पूर्ण कल्पना आहे!जे घडेल, ते
    बेहोशीत घडून जावं...शुद्धीवर आल्यावर त्याची जाणीवही
    राहू नये, म्हणून तरी मला हा ग्लास संपवलाच पाहिजे.पण
    शुद्धीत असताना मी काय सांगते ऐकून ठेवा.माझ्या
    किरणला आज नोकरीची गरज नसती तर...थोड्या वेळानं
    जो देह तुम्ही विवस्त्र पाहणार आहात मनसोक्त उपभोगणार
    आहात...त्या देहाचं नखसुद्धा तुमच्या दृष्टीस पडलं नसतं!
    पण माझ्या दुर्दैवानं,दान तुमच्या बाजूचं आहे.त्याला
    नोकरीची नितान्त आवश्यकता आहे. म्हणूनच आजच्या
    रात्रीपुरता हा देह तुमच्या स्वाधीन करणार आहे!'
    असं म्हणून तिनं ग्लास तोंडाला लावला.गटागट पिऊन
    टाकला
    तो आवाक्‌!त्याच्या हातातला ग्लास तसाच.
    'घ्या मिस्टर... घ्या !अपराधाची बोचणी लागून मजा
    किरकिरा होणार नाही म्हणजे!'
    त्यानं निमूटपणे ग्लास उचलला.संपवला.
    ______________________________________________

    ...'न्याय-अन्याय'तपासाची सूत्रं अशोक फडकरच्या हाती जायला नको होती!डिपार्टमेंटचा
    हा एक माणूस टेरर आहे. नसलेलं सूत निर्माण करून,त्या वरुन स्वर्ग
    गाठण्यात त्याचा हात कोण धरणार नाही!
    आणि पोलिस आहे का कोण हो! साला औषधाला पैसा खाईल तर शपथ!
    -हे फार वाईट!
    म्हणजे, हा या ना त्या प्रकारे योग्य मार्गाने माझ्यापर्यंत पोहोचला,तर...!
    दिवाभीतीचं आयुष्य-या शब्दाचा अर्थ मला तेव्हा खर्‍या अर्थाने कळला!
    दारावरची बेल वाजली की,माझे हात-पाय गळायचे!कामाच्या ठिकाणी कोणी
    हाक मारली की,खपकन्‌ हृदय बंद पडायचं!
    माझं नशीबच थोर,म्हणून या काळात माझी न्‌ फडकरची कुठे समोरासमोर
    गाठ पडली नाही!
    तरंगिणी गेली...ऐन तारुण्यात गेली....अशा प्रकारे गेली...तिच्या मृत्यूला
    आपणच जबाबदार आहोत.
    सगळं मला मान्य होतं.झाल्या प्रकाराबद्दल मला दु:ख वाटत होतं.मन:पूर्वक
    पश्चातापही होत होता.
    पण असा विचार करा-मी काही कोणी सराईत खूनी नाही.सायकिक तर त्याहून नाही.
    किंबहुना,गुन्हेगारी प्रवृत्तीबद्दल मला स्वत:लाच चीड आहे.मग,मी न सापडल्याने,एक
    मोठा गुन्हेगार मोकला रहातो,अशातला भाग नाही,हे तुम्हीही मान्य कराल.कसं घडलं
    ते मी तुम्हाला हातचं काहीही न राखता सांगितलंच आहे.
    तरंगिणी तर गेली.आता,मी माझे प्राण वाचवायला प्रयत्न केला तर,त्यात चूक
    काय आहे?
    हा मुद्दा लक्षात येताच, माझं डोकं विचार करायला लागलं.
    फडकर कसा तपास करतो-त्याला काय मिळतं...नुसतं पाहात बसून चालणार नाहीये!
    पुराव्याअभावी पोलिसांनी केस फाईल केली तरी डोक्यावर आयुष्यभर टांगती तलवार राहिल!
    त्यापेक्षा,आपणच फडकरला आपल्या दृष्टीनं सुरक्षित अशी शोधाची दिशा दिली पाहिजे.
    खटला निकाली झाला पाहिजे!
    दोन दिवस मी त्याच विचारात होतो.आणि तिसर्‍या दिवशी माझ्या विचारांना दिशा
    मिळाली.
    तो-एल्‌.आय्‌.सी.डेव्हलपमेंट ऑफिसर!
    काही इलाज नाही! तो या प्रकरणा संदर्भात तरी इनोसन्ट आहे,हे मला माहित आहे.
    पण,माझी मान निश्चित्पणे वाचवायची असेल तर,त्याची पक्की अडकणं आवश्यक आहे!
    निर्णय घेताना मला वाईट वाटलं खरं;पण शेवटी...
    न्याय-अन्याय...सगळ्या टर्मस्‌ सापेक्षच की!
    __________________________________________________

    दुनीयादारी
    तुझं प्रेम हे आकाशाइतकंच खरं नि सर्वव्यापी आहे रीन जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी आपण आकाशाच अस्तीत्व नकारु शकत नाही पण रीन, म्हणुन कोणी आकाशाखालीच निवारा शोधत नाही! त्यासाठी घराच्या अस्तित्वाची गरजही तितकीच प्रखर असते! तु माझ आकाश आहेस श्रध्दा माझा निवारा आहे! मी तुझं आकाश आहे; धीरुभाई तुझा निवारा आहे आकाशानं आकाशाइतकचं भव्य राहावं रीन त्यानं कोणाच्या निवाऱ्याचं छप्पर हो उ नये!

    __________________________________________________

    'क्षितिज'
    माफ करा विश्वासदा!तुम्ही दिलेलं हे बक्षीस मी आजपर्यंत अभिमानाने जपलं
    कसेही प्रसंग आले तरी ते काधून टाकण्याचा विचारही माझ्या मनात डोकावला नाही.पण...
    आज मी ही सिगारेट-केस लायटरसह विकू इच्छितो!
    सारं जग-विश्वाचे सारे मानवी व्यवहार भाकरीच्या एका चतकोरात सामावतात,हे
    आज मला पटलं.तुम्हाला पटलं तर तुम्हीही मला माफ कराल!
    तुम्ही उत्स्फूर्तपणे दिलेली ही छोटीशी भेट विश्वासदा,या भेटीच्या
    रुपानं एकदा सारं विश्व मुठीत बंदिस्त झालं होतं.सारी इन्डस्ट्री तेव्हा पायाशी असल्यासारखं
    वाटलं होतं.भविष्याच्या स्वच्छ निळ्याभोर आकाशात एक सप्तरंगी क्षितिज-रेषा दृष्टीपथात
    आली होती.पौर्निमेचा उगवता चंद्र असा$ हात लांब करुन हातात घेण्याइतका सहजप्राप्य
    वाटावा,तशी ही क्षितिज-रेषा चार पावलांवर भासत होती.या रंगीत क्षितिजावर एक
    दिमाखदार,टप्पोरा तारा स्वयंतेजाने तळपत होता.कीर्ती...पैसा...मानसन्मान...असे त्याचे
    कितीतरी पैलू नजरेच्या टप्प्यात होते.वाटलं होतं, या क्षितिज-रेषेपाशी लवकरच आपल्याला
    पोचायचं आहे.मग तो उगवता तारा हळूच स्वत:हून खुडला जाईल.आपल्या माथ्यावर विराजमान होईल.
    आता मला कळलं आहे विश्वासदा;
    तुम्हाला कळलं आहे का?
    कोणत्याही अतृप्त कलावंताची अधाशी नजर अशाच एका क्षितिज-रेषेवर खिळलेली अस्ते.
    या रेषेवर एक तारा अस्तो.
    या तार्‍याचं प्रतिनिधीक रूप म्हणजेच कलेतला आपला आदर्श.
    या आदर्शांपर्यंत पोहोचणं,हेच आपल्या कला-जीवनाचं ध्येय.सांगता.
    हा तारा हासिल करण्यासाठीच कलाकार तन-मन-प्राण पणाला लावून आयुष्यभर
    झिजतो,कष्ट घेतो.पावलाला शेकडों जन्मांची तपश्चर्या करीत या क्षितिज-रेषेकडे सरकत राहातो.
    आणि...
    क्षितिज हाती लागत नाही;
    तार्‍याची जागा सापडते,तर ताराही पुढे सरकलेला!
    किती चमत्कारीक आहे हे विश्वासदा!
    या तार्‍याची नजरही दूर कुठेतरी स्थिरावलेली असते.त्याच्या नजरेसमोरही,
    त्याच्यापुरती दिसणारी अशी एक क्षितिज-रेषा असते.तिथेही एक दैदिप्यमान तारा लखलखत
    असतो.आणि ती जागा मिळत नाही म्हणून आपला तारा असमाधानी असतो.दु:खी असतो.
    कष्टी असतो.उदास असतो.
    प्रत्येक कलाकाराचं क्षितिज असं त्याच्या दृष्टीपथात;
    हाती मात्र येत नाही!
    ____________________________________________________

    ’स्वीकृत’
    ’का गं झोप नाही लागत का?’
    प्रश्न उत्तर देण्यासाठी नव्हताच. नि:शब्दपणे ती त्याच्या शेजारी येऊन बसली. सिगारेटचा देखणेपणा ऐटीत जळत तिचं पार थोटूक होईपर्यंत ती पहात राहिली. मग त्यानं ते थोटूक रस्त्यावर उडवलं.रस्त्याच्या मध्यावर पडून ते रागावल्यासारखं भकभकत राहिलं. धुराची एक अशक्त रेषा सरसरत राहिली.
    हेच माणसाचं जीवन. आयुष्यभर असं जळत राह्यचं...नाहीतर विझून राख होऊन जायचं! मागे सिलकीत काहीच नाही शेवटी!
    मी कोण, कोठुनि, कशास्तव येथ आलो?
    ही इंद्रिये धरुनि सज्ज कशास झालो?
    कर्तव्य काय मज येथ करावयाचे?
    -मेल्यावरी तरि कुठे, मज जावयाचे?
    ...कोण?
    कशासच उत्तर नाही आपल्यापाशी. अगदी प्राथमिकसुद्धा!
    एका स्त्रीच्या आणि वासनेतून...त्यांच्या कामक्रिडेचं फळ म्हणून...त्यांची इच्छा म्हणून जन्माला आलो. कोणाच्या न कोणाच्या आधारे जळत...जाळत मोठा झालो.का? कशाकरता?
    ...डोन्ट’ट नो!
    एका स्त्रीला य:कश्चित गर्भ देऊ शकत नाही आपण... या प्रश्नांच्या अंतापर्यंत काय पोहोचणार?

    ____________________________________________________

    सूत्रबद्ध्
    एकदा सम्बध येन्यापूर्वी,तो येऊ न देण माणसाच्या हातात असत. एकदा सम्बध आला की,'आपण एकमेकांची ओळख विसरुन जाऊ! हेही चालत नाही! एकदा माणूस कळला की आपल्या किंवा त्याच्या अंतापर्यंत तो असतोच!

    ____________________________________________________

    ’काळंबेरं’
    आत...आत,जंगल-गाभ्यात खोल...खोल शिरत...
    अखेर मी त्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलो होतो!
    वृक्षतोड करुन,सोयीनं तयार करुन घेतलेलं मैदान.त्यात,आपली कबर कोणती,ते मृतालाही आता ठामपणे सांगता येणार नाही,इतक्या त्या मेलेल्या...पडझड झालेल्या...रंगावर धुळीचे लोट बसलेल्या...स्वत:ची ओळख हरवून बसलेल्या कबरी...
    आणि,एक चबुतरा!तो मात्र तुकतुकीत,स्वच्छ!
    कबरी तशा फारशा नव्हत्या.’किती आहेत?’असं मनाशी विचारत,मी पुढे येताना त्या मोजूनही टाकल्या!
    एक...दोन...ती चौथी...सहा...सात...दहा!
    दहा!
    हा आकडा कबरींच्या संदर्भात मला परिचयाचा वाटला.जणू,कबरी म्हटलं की,त्या एका जागी दह-दहाच्या बंचमधेच असणार!
    मग,अगदी अचानकपणे,या ’दहा’चा संदर्भ लागला;आणि मी नखशिखान्त शहारलो.
    दहा!अली-बंधू अकराजण होते.पैकी,सादिक एकटा जिवंत आहे!
    दहा भावांच्या दहा कबरी!
    आणि... हा चबुतरा राखीव-अकराव्या कबरीसाठी?
    या क्षणी तो संपूर्ण रिकामा होता;पण चबुतर्‍याचे संदर्भच बदलल्याने,मला त्याच्याकडे पाहताना शहारल्यासारखं होत होतं.
    एक-एक जड पाऊल पुढे नेटानं रेटत,मी चबुतर्‍याच्या जवळ आलो.सूचना फीड केलेल्या यंत्रमानवासारखा माझा हात आपोआप माझ्या खिशाच्या दिशेनं गेला.तो अंगारा काधून या चबुतरा-
    खलास!
    विंचवानं नांगी मारल्यासारखा हात खिशातून बाहेर!
    त्याच वेळी,अज्ञातातून कोणीतरी खुद्‌कन्‌ टिंगलखोरपणे हसलं!
    ओह!काय स्थिती झाली असेल माझी!
    ज्या अंगार्‍याच्या जिवावर रुबाब करीत,इथपर्यंत येणुआचं धाडस केलं होतं,ती अंगार्‍याची पुडी होती कुठं-?
    पाण्यात पडलो, तेव्हाच ती भिजून फाटली होती!
    -आता?
    क्षणार्धात्‌,मनानं विद्युतवेगानं सूचना केल्या.शरीरानं त्या तंतोतंत पाळल्या.खिशात हात घालून मी तो उलटा केला. खिशातला लगदा हाती येताच,तो चबुअतर्‍यावर भिरकावला. चारी दिशांना फुंकणं आता विसरा!
    दुसर्‍या क्षणी मी चबुतर्‍याकडे पाठ वळवून पळत सुतलो!
    इतकं सगळं झालं;पण हातातली ’देवकाठी’ मात्र मी सोडली नव्हती!
    ______________________________________________________

    'लटकंती'
    धनमच भूमौ, पशवश्य गोष्ठे! कांता गृहदरारे जनम स्मशाने !!
    देहाश्यितायम परम्लोके ! कर्मानूगो गच्यान्ती, जीव एक !!"

    म्हणजे, आताच्या पध्तीनूसार,
    धन सम्पत्ती घरातल्या सेफ मध्ये नाहीतर बैंकयेच्य खात्यात राहाते पशु पक्षी प्राणीही जागच्या जागी रहातात खुद्द आपण जीला अर्धांगिनी म्हणतो ती आपली पत्निही पूर्नात्वाने घराच्या दरवाज्या परेन्त सोबत येते. नातेवैक मीत्र वगैरे स्मशाना परेन्त सोबत येतात. आपला अत्यनत खासगी मालकीचा देह चितेवर आपल्याला सोडून पंच्तात्वात विलीन . मग यातल नेमक आपल काय?
    तर काही नाही
    काहीच नाही.
    कशासाठी साम्भालायाच मग हे?
    त्या कोना पर्मेस्वराचा एक काल्पनिक खेल चालू रहावा म्हणून?
    गाड्गवाच्या G त जा ना, साला, मला काय देन-घेण या तुझ्या खेलाशी?
    मी या शनी हे आयुष्य संपवायला तैयार आहे!
    आईशपत,
    हे असच घद्धानार आहे, याची त्या शनी मला कल्पना नव्हती हो!

    __________________________________________________

    आशिष कुलकर्णी..

    Suhas Shirvalkar, SuShi, Marathi Lekhak

    Read more! / पुढे वाचा..


    Sunday, August 09, 2009

    फिलीपिन्स सरकारतर्फे देण्यात येणारा यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार सामाजिक चळवळीत रमणाऱ्या दीप जोशी यांना जाहीर झाला. अन, एकदम दीप जोशी हे नाव प्रकाशझोतात आले. देशाच्या ग्रामीण भागाच्या स्वयंपूर्णतेसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि संस्थांना दीप जोशी हे नाव नवखे नाही. तीस वर्षांहूनही अधिक काळ ते समाजकारणात कार्यरत आहेत. अमेरिकेतील मॅसॅच्युएटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी येथून त्यांनी इंजिनिअरींगचा अभ्यासक्रम पुरा केला. तसेच सोलनस्कूल येथून त्यांनी व्यवस्थापनातील पदवी प्राप्त केली. मुळातच सामाजिक कामांची आवड असणाऱ्या श्री. जोशी यांनी अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सामाजिक कार्याचा धडा गिरवला आहे. त्यात सिस्टिम रिसर्च इन्स्टिट्यूट आणि फोर्ड फाउंडेशन यांचा समावेश आहे.

    देशाला स्वातंत्र्य मिळवून इतकी वर्षे झाल्यानंतरही ग्रामीण भागाची भीषण अवस्था त्यांना स्वस्थ बसू देईना. ग्रामीण भाग हेच आपले जीवितध्येय समजून त्यांनी १९८३ मध्ये नवी दिल्ली येथे प्रदान (PRADAN) या संस्थेची स्थापना केली. आज देशातील सातपेक्षा अधिक राज्यांमधील सुमारे ३०४४ पेक्षां ही जास्त खेड्यांमध्ये संस्थेचे कार्य विस्तारले आहे. ग्रामीण भागांची स्वयंपूर्णता याविषयावर वाहून घेतलेल्या या संस्थेतर्फे महिला सक्षमी करणासाठी बचत गट, गावे रोजगारक्षम करणे, अपारंपरिक साधनांच्या मदतीने उर्जा निर्माण करणे आदी बाबींवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. आगामी दहा वर्षांत देशभरातील आणखी दीड कोटी सामान्य जनतेपर्यंत पोचण्याचा संस्थेचा मानस आहे.

    संस्थेचे आधारस्तंभ
    ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करून, शहरीकरणाचा वाढता वेग नियंत्रणात आणणे हे काही येरा गबाळ्याचे काम नव्हे. ही कामे स्वत:च्या खांद्यावर झेलून उद्दिष्टाप्रत पोचविण्यासाठी संस्थेचे अनेक तरुण कार्यकर्ते सज्ज आहेत. तरुण कार्यकर्त्यांची संघटना अशी प्रदानची दुसरी ओळख आहे. संस्थेकडे असणाऱ्या एकूण कार्यकर्त्यांची कामाच्या दृष्टीने ३१ तुकड्यांमध्ये विभागणी करण्यात आली असून, या तुकड्या देशाच्या निरनिराळ्या भागात कार्यरत आहेत. देशाच्या दूर दुर्गम भागातील आदिवासी आणि इतर जमातींसाठीही प्रदानचे कार्यकर्ते सक्रीय आहेत.

    महिला सक्षमीकरणासाठी बचतगट चळवळ
    संस्थेच्या आकडेवारीनुसार राजस्थान, मध्यप्रदेश, बिहार, झारखंड, पश्‍चिम बंगाल, छत्तीसगढ आणि ओरिसा या सात राज्यात मिळून सध्या ७ हजार ५१२ महिला बचतगट संस्थेअंतर्गत कार्यरत आहेत. त्याचा लाभ सुमारे एक लाख सात हजार ग्रामीण कष्टकरी महिला घेत आहेत. या बचतगटांच्या माध्यमातून सुमारे २२.५० कोटी रुपयांची बचत करण्यात या महिलांना यश आले आहे. या आर्थिक सुबत्तेच्या गंगेचे व्यवस्थापन करण्यासाठी संस्थेतर्फे काही महिलांना संगणक प्रशिक्षित करण्यात आले आहे.

    साधनसंपत्ती रक्षण
    प्रदान संस्थेचे कार्य प्रामुख्याने आदिवासीबहुल राज्यात चालू असल्याने त्यांचा संबंध आदिवासी, जंगले आणि साधनसंपत्तीशी येतो. नैसर्गिक साधनसंपत्तीला कोणताही धोका न पोचविता त्यापासून मिळणाऱ्या पदार्थांची विक्री आणि विपणन करण्याचे आधुनिक शिक्षण या बांधवांना देण्यात येते. याशिवाय शेतीच्या आधुनिक पद्धती, फळबागा व्यवस्थापन आणि माती तसेच पाण्याचे व्यवस्थापन, पाळीव प्राण्यांची निगा, दुग्धोत्पादन, शेळीपालन, कुकुटपालन आणि अळिंबी उत्पादन याविषयी ग्रामीण बांधवांना प्रशिक्षित करण्यात येते.

    सध्याच्या काळात देशात भारत आणि इंडिया यांच्यातील दरी वाढत असताना खऱ्या अर्थाने ग्रामीण भारताला सक्षम करणाऱ्या प्रदान संस्थेला आणि त्यांच्या हजारे तरुण दमाच्या कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा..... अशा या संस्थेच्या संस्थापकाला (दीप जोशी) रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाल्याने पुरस्काराच्या गौरवातच वाढ झाली आहे, यात शंकाच नाही.
    संपर्क:
    प्रदान,
    पोस्ट बॉक्‍स नं.३८२७,
    ३, कम्म्युनिटी शॉपिंग सेंटर, नीति बाग,
    नवी दिल्ली.
    दूरध्वनी क्रमांक : ०११ २६५१८६१९, २६५१४६८२
    संकेतस्थळ : www.pradan.net

    वरिल लेख हा विहंग घाटे यांनी दै. सकाळ साठी लिहिला. वाचकांच्या माहिती साठी हा लेख महाराष्ट्र माझा वर देत आहोत.

    Read more! / पुढे वाचा..


    खरेतर हा आहे फॉरवर्ड ई मेल. कदाचित मुंबईतल्या कुणीतरी हौशी ट्रेकरने बनवलेला. निनावी...पण, खूप छान आहे. श्रावणात ट्रेकिंगची खरी बहार. त्यामुळंच तो इथं देत आहोत...(लक्षणे तुम्हीही वाढवायला हरकत नाही...!!!)

    ट्रेकरची लक्षणे अर्थात ट्रेकर कसा ओळखावा :-

    १.चेहरा: बहुधा रापलेला . दाढ़ी मिश्यांचे नक्कीच काही ना काही कीडे केलेले असतात. त्यातही French beard किंवा सैफच्या टशन स्टाइल मिश्या यांच्या फार आवडत्या. काही ट्रेकर्स असेही असतात जे दाढ़ी मिश्या ठेवत नाहीत त्यांना मुली असे म्हणतात :)

    २.केस: एकतर अतिशय बारीक़ कापलेले किंवा खुप लांब ..मुले मुली दोघांचेही :)

    ३.वेशभूषा: आठवड्यातील दिवसाप्रमाणे

    सोमवार ते गुरुवार: चेक्सचा शर्ट , जीन्स, पायात चप्पल. खांद्याला चिंगुली सैक हीला ट्रेकच्या भाषेत पिट्टू म्हणतात. त्याला एखादा snap किंवा रंगीबेरंगी स्लिंग जरुर अडकवलेली असते.

    शुक्रवार रात्र: निघायची तयारी ...ख़राब फीटिंगची पण प्रचन्ड comfortable ट्रैक पँट , Bombay Natural History Society चे कुठल्या तरी दुर्मिळ पक्ष्याचा फोटो असलेले टी शर्ट , कमरेला वेस्ट पाउच (ही एकखासचीज आहे ...हिच्याविषयी विस्ताराने पुढे येईलच ) ,पायात अनुभवी बनचुका ट्रेकर असल्यास स्लीपर / मध्यम अनुभवी असल्यास फ्लोटर्स / अगदीच नवखा असल्यास भारी बूट :)

    शनिवार दुपार ते रविवार दुपार: वर उघडाबंब , डोक्यात माकडटोपी , खाली ट्रैक पँट ...काही ट्रेकर्स उघडे नसतात त्यांना मुली असे म्हणतात :)

    Maharashtra, Maharashtra Majha
    ४.सापडण्याची जागा: आठवड्यातील दिवसाप्रमाणे

    सोमवार ते शुक्रवार सकाळ: आपापला धंदा नोकरी व्यवसाय ...नाईलाजाने.

    शुक्रवार रात्र: CST स्टेशनच्या मोठया घडयाळाखाली ... ही trek साठी भेटण्याची जागा.

    शनिवार पहाट: कर्जत, मुरबाड, लोणावळा, कसारा, इ. इ. S T stand

    शनिवार दुपार ते रविवार दुपार: कुठल्यातरी गडावरील केव्ह

    ५.अन्य विशेष लकबी:हे कुठल्या ना कुठल्या ट्रेकिंग क्लबचे मेंबर जरुर असतात , पण ९० % वेळा दुसऱया club बरोबर ट्रेकला जातात :)

    ट्रेकला वा शहरात कुठेही कोणताही प्लास्टीकचा कचरा टाकत नाहीत .... साधी गोळी जरी खाल्ली तरी कागद व्यवस्थीत खिश्यात ठेवतात. कोणत्याही प्रदूषणाचा यांना तिटकारा असतो. पण किल्ल्यावर केव्हमध्ये कधी कधी ध्वनी + वायु प्रदुषण जरुर करतात :) त्यातही त्यांची फारशी चूक नसते. रात्री उशिरा निघणे, वेळी- अवेळी खाणे, दगदग यामुळे बिचार्यान्चे पोट थोड़े फार बिघडते :)

    बोलता बोलता मध्येच खालील शब्द फेकतात : आजोबा, अलंग, कुलंग, कोल,केव्ह, traverse , तिकोना, पिंचहोल्ड, हंप इत्यादी इत्यादी

    यांचे एकंदरीत काम अगदी सुबक असते , एखाद्या सराईत गृहिणीसारखे : उदाहरणार्थ सैकमध्ये प्लास्टीकची पिशवी, तिच्यात कपडे, कपड्यांच्या घदीत प्लास्टीकची छोटी पिशवी, तिच्यात छोटी डबी , तिच्यात कागदाची पुडी आणि तिच्यात शिट्टी :) यांचा wastepouch ही एक धमाल चीज असते : यात caluclator , nail कट्टर पासून सुई दोर्यापर्यंत जगातील काहीही अफलातून गोष्ट असते . एका ट्रेकरच्यापाउच मध्ये मी एकदा फॉर्म १६ A बघीतला होता आता बोला :) सैक सुद्धा अशी सुरेख भरतील की पाहत रहावं .

    ६.खाण्या पिण्याच्या सवयी:

    कशालाही नाही म्हणणार नाहीत :) हवे ते हक्काने मागून घेणार :)

    काहीतरी विचित्र करून दुसरयाचे लक्ष वेधून घेण्याची वाईट खोड . बिस्किटे पाण्यात बुडवून खाणे , श्रीखंड पाव , केळ पाव खाणे इत्यादी :)

    पाणी अतिशय जपून वापरतात . बाटलीतील पाणी ओतायची यांची खास पद्धत असते . बाटलीचे झाकण उघडून बाटलीच्या तोंडावर डाव्या हाताची तर्जनी आणि मधले बोट दाबून धरायचे आणि थोडीशी मोकळी जागा ठेवून बाटली हळूवार कलती करायची यामुळे पाणी भस्सकन पडत नाही

    ७.गडावर असताना यांची करमणुकीची साधने:

    खणखणित आवाजात पोवाडे गाणे

    जुन्या ट्रेकच्या आठवणित रमणे

    बैटिंग ला जाणे :)(बॅटिंग म्हणजे क्रिकेटमधील नाही. सक्काळी सक्काळी खुल्या आभाळी एखाद्या आडोशाच्या पिचवर जी होते ती.)

    ८.यांची दैवते:

    off course शिवाजी महाराज

    रायगडचा जगदीश्वर

    हरिश्चंद्र गडाचा खिरेश्वर , रतन गडचा अमृतेश्वर इ . इ .

    ९.यांची तिर्थस्थळे:

    राजमाचीचा तलाव

    बाण चा ब्लू लगून

    नाणे घाटातील केव्ह

    कोंकण कडा इ . इ .

    आणि हो ज्याप्रमाणे प्रत्येक आज्जीचं एकदातरी काशीयात्रा करण्याचे स्वप्न असते त्याचप्रमाणे प्रत्येक ट्रेकरचे निम् (नेहरू इंस्टिट्यूट ऑफ़ mountaineering) ला जाऊन बेसिक कोर्स complete करून A ग्रेड घेउन यायचे स्वप्न असते :)

    १०.ट्रेकर्स विषयी काही मोठ्ठे गैरसमज

    यांना मुली आवडत नाहीत

    Thanks, esakal.com

    Read more! / पुढे वाचा..



    स्वतःचा ’ईमेल’ नोंदवा व मोफ़त अपडेट्स मिळवा.
     
    SMS Alerts: मोफ़त माहिती मिळवा मोबाईल वर.

    ओळख ब्लॉगरशी.

    आशिष कुलकर्णी, महाराष्ट्र माझा हा ब्लॉग २००३ साली सुरु केला. मी संगणक व्यवस्थापन या विषया मध्ये उच्च शिक्षण घेतलेले आहे. माझ्या समाजकारण आणि राजकारण यांच्या आवडिपोटी चालु केलेला हा ब्लॉग आपल्या पसंतीस पडेल हिच आशा ठेवतो.


    Follow Ashish Kulkarni on twitter


    सेन्सेक्स चे आकडे (LIVE)
    BSE

    Graph

    NSE
    Graph
    सौजन्य: economictimes.com indiainfoline.com

    ताज्या बातम्या / Latest News






    © Ashish, Some Article can not be copied by any means without written permission.
    Life in BPO | Orkut Fun