We have moved, please visit
www.MaharashtraMajha.com

 
  माझ्या महाराष्ट्राचा माझा ब्लॉग ..महाराष्ट्र माझा..  
 

!! महाराष्ट्र माझा !!
               साम । दाम । दंड । भेद

 

Make HomePage | Bookmark this site! | Know Your IP



हेही वाचाच..
  • बाळ केशव ठाकरे.
  • मागिल काहि महिन्यातील लेख.


    Advertisement:
    SMS- JOIN MYSHIVSENA to 567673434 & become a proud member of ShivSena's SMS Group.


    आणखि काहि लिंक्स..
    लाईफ़ इन बीपीओ..
    ऑर्कुट मज्जा...
    या ग्रुप मध्ये सामिल व्हा.

    Enter your email address:

    Delivered by FeedBurner


    Tuesday, March 18, 2008

    मी राहतो सध्या पुण्यात, पुणे म्हणजे काय एकदम भारी. पुण्यात काय कमी आहे ते सांगा. पुण्यात आल्यावर मीटर मध्ये गोची करुन फ़सवणारे रिक्षावाले आहेत. ’चकचकित’ रस्ते आहेत, काय तो अपवाद असेल तो असेल, दर शंभर मीटरला पाच-दहा खड्डे म्हणजे काय विशेष? भरगच्च भरुन खळखळत वाहणारि पीएमटी आहे (आता याला पीएमपीएल म्हणतात). चालायला काहि रस्त्यांवरती तर चक्क फ़ुटपाथ आहेत. दर दोन मिनीटांनी एक मिनिट थांबवुन ठेवणारे सिग्नल्स आहेत. अगदि श्वासाश्वासात पुणे वसावे म्हणुन रस्त्यांवरती धुळिचे साम्राज्य आहे. सकाळि जाउन संध्याकाळि घरी आले कि कसे अगदि छाती मध्ये अर्धा-एक किलो ’पुणे’ असतेच. सगळे कसे अगदि सुरळित चालु आहे. एकदम फ़ॉरेन मध्ये राहिल्या सारखे वाटतेय.
    पण अचानक हे काय घडले? पुण्यात भारनियमनाच्या बाता? दिड तास पुण्यात वीज जाणार म्हणे. हे ऐकल्यावर आपण एकदम महाराष्ट्रात राहतोय कि काय असेच वाटायला लागलयं. काय ती पुण्याची शान आणि तिथे आता भारनियमन लागु करणार?
    खरं सांगु मनात कुठेतरी बरेचं वाटले कि आता पुण्यात हि भारनियमन होणार. महाराष्ट्रातली खेडी १६-१८ तास भारनियमाने ग्रस्त असताना पुण्यात जाहिरीतांच्या होर्डिंग्जवर होणारी दिव्यांची उंदंड उधळपट्टी बघुन उगीचच वाईट वाटायचे. एकिकडे विहिरीत पाणि असुन ते वीज नसल्यामुळे पिकांना पाणि न पाजु शकणारा, कोरड्या शेतीकडे हताशपणे पाहत बसणारा माझा शेतकरी तर इकडे.. आमच्यात सेल आहे आमच्या कडे या म्हणुन घसा कोरडे करणारे जाहिरातीचे जंबो फ़लक. हा विरोधाभास कुठे तरी थांबवलाच पाहिजे होता.
    पुण्यात अनेक उद्योग आहेत, त्यावर अनेक पोटे भरतात म्हणुन इथे भारनियमन नाहि. खेड्यात राहणार्यांना मग काय पोटच नाहि काय? अरे दुकान उघडु कधि हा इथल्या दुकानदांरांना पडणारा प्रश्न. आता तर उन्हाळा येतोय. लहान लेकरांचं रडुन रडुन आता हाल बेहाल होतील, कारण डोक्यावर पंखा आहे पण तो चालु करायला वीजचं नाहि.
    काय तो माझा एकवेळचा महाराष्ट्र आणि काय त्याचे आज हाल करुन ठेवले. अरे रोज १०-१२ तास लोके बिना वीज ठेवता तुम्हि? संध्याकाळि सर्वत्र अंधारचे साम्राज्य. संध्याकाळि कुठे बाहेर फ़िरायला जाणे झालयं मुश्किल. गेल्या आठ वर्षे महाराष्ट्राचा कारभार करता तुम्ही आणि आज महाराष्ट्राची हालत काय तर सगळा महाराष्ट्र अंधारात. अरे लाजा कश्या वाटत नाहि असला कारभार करुन वर उजळ माथ्याने फ़िरताना. लोंकाच्या मनात हि आता एवढा राग आहे कि एकदा आमच्या महाराष्ट्राचे हे ’कंदिल मंत्र’ लोकाना भेटायला म्हणुन आपल्या ताफ़्या सह गेले होते. तिथल्या लोकांनी एकदम ऐतिहासक स्वागत केले यांचे. सडके टॉमेटो, अंडि, दगडं आणि चपला हाणल्या डोक्यात. या ’कंदिलरावांच्या’ गाडिवर दगडफ़ेक. कंदिलराव एवढे घाबरले कि आपला ताफ़ा वगैरे सगळे सोडुन पोलिसांच्या जिप मधुन तिथुन पळ काढला. तर अशी हि आमच्या आदरणीय मंत्र्याची अवस्था. लोकांना तोंड पण दाखवायची आता यांची उरली नाहि.
    जमत नाहि आपल्याला एखाद्या खात्याचा कारभार तर सरळ लोकहिता साठि सोडुनद्यावाना कारभार. बसवावे या जागेवर एखाद्या लायक माणसाला का एकदा चिकटले कि सोडायचेच नाहि. किमान अंडि-टोम्याटोंचा आहेर तरी मिळाला नसता. फ़ेविकॉलने या मंत्र्यांना आपला ब्रॅंड अंब्यासिडर म्हणुन घ्यावे. यांचा खप दुपटिने काय तिपटिने वाढेल. कारण हि वांगी एकदा खुर्चिला चिकटली कि हा जोड तोडणे ’मुश्किल हि नहि नामुमकिन है’ हे सगळे जग पाहतच आहे.
    आज महाराष्ट्राची अवस्था बिकट आहे. आपल्या राज्याचा विकास अगदि बैलगाडिच्या वेगाने होत आहे. केवळ मुंबई-पुणे-नाशिक हा पट्टाच म्हणजे महाराष्ट्र नव्हे. महाराष्ट्र खुप मोठा आहे. विकास महाराष्ट्राच्या कोपर्या कोपर्या पर्यंत पोहचला पाहिजे. विकासासाठि काहि गोष्टि अश्या आहेत कि त्या अगदि मुलभुत आहेत. तुम्हि मुबलक स्वरुपात वीज द्या. तुमचा विकास हा आपोआप होइल. विजे करता नवीन ’प्रोजेक्ट्स’ आणा. विजतारांचे चांगले जाळे विणा. त्यावेळि या विजतारांमधुन केवळ विजच वाहत येणार नाहि तर विकास हि वाहत येइल. लोकांचे जिणे सुकर होइल.
    या करता काय केले आमच्या कंदिलरावांनी? तर काहि नाहि. आठ वर्षात एक मेगावॅट विज नाहि तयार करु शकला तुम्हि? आता विजेची तफ़ावत आपल्या राज्यात किती तर एक दोन नव्हे तर तब्बल पाचहजार मेगावॅटची. आता मात्र यांच्या त्याला आग लागल्या सारखे आरडा ओरडा करत आहेत. आम्हि हा प्रोजेक्ट आणु आणि आम्हि ते करु. अरे विज म्हणजे काय यांना खोटे रेशन कार्ड वाटले काय? कि चारले थोडे पैशे कि घरपोच हजर. विजेसाठि दुरद्रुष्टि ठेवुन कारभार करावा लागतो. इथे दुर काय द्रूष्टिच नाहि. वाट लावुन ठेवली महाराष्ट्राची.
    आता इलेक्शन्स येत आहेत. या वेळि तरी जनतेनी योग्य निर्णय घ्यावा. शेतकर्यांना मोफ़त विज देतो असे सांगुन सत्तेत आले आणि हालत काय तर ५००० हुन जास्त शेतकर्यांच्या आत्महत्या. या आत्महत्या नाहियेत तर सरकारच्या दळभद्रि कारभाराने केलेल्या हत्या आहेत. या हत्यांची पापं या सरकारला फ़ेडावीच लागणार. सरकारचे काम असते राज्याच्या संसाराचा गाडा सुखाने चालवायचा. जनतेने विश्वास ठेवुन यांना आपला कारभारी म्हणुन निवडला पण या संसाराची अत्ताची हालत कशी तर.. ’पति कमजोर और पत्नि निराश’.
    जनता आता अगदि वैतागुन गेलिये. कामाच्या नावाने पैसे तर तिजोरितुन जातात पण काम? नुसता भ्रष्टाचार. हे आता थांबवावे लागणार. आता या कारभार्यांशी नाते तोडावेच लागणार. नाहि तर महाराष्ट्रात १८ काय २४ पैकि २४ तास भारनियमन करावे लागेल. आणि हे नाते तोडायचे काम महाराष्ट्राच्या जनतेलाच करावे लागणार.. असे नाहि झाले तर तुमचे जिणे तुम्हालाच चांगभले. हे असे अंधारात जिणे तुम्हाला आवडेल काय?

    Read more! / पुढे वाचा..


    Thursday, March 13, 2008

    हिंन्दुत्वाचा टणत्कार. व्यंगचित्रकार ते हिन्दुह्रुदयसम्राट

    तोन्ड वाजवुन न्याय मिळत नसेल तर
    तोन्डात वाजवुन न्याय मिळवा,
    पण न्याय हा झालाच पाहिजे.

    एक माणुस तुमच्या माझ्या सारखाच, उंचीने आणि वजनाने मात्र कमीच. पाहत होता आपल्या आजुबाजुची परिस्थिती. होणारा मराठी माणसावरचा अन्याय, तोहि महाराष्ट्रातच. मूग गिळुन गप्प बसलेले सरकार. ती चारी बाजुने होणारी गळचेपी. आता काय करावे..आपण हि गप्प बसावे कि आवाज उचलावा. तो माणुस सामान्य नव्हता त्याने शांत बसणे हा विचार कधीच केला नाहि आणि फ़ुंकली तुतारि मराठि अस्मितेसाठी कारण तो होता बाळ ठाकरे.

    बाळने आपला तोफ़खाना उघडला. बघता बघता मावळे जमु लागले, ताकद वाढु लागली. पण नक्कि करु काय हा प्रश्न होताच. इथेच वडिलांनी प्रबोधनकार ठाकरेंनी प्रश्न विचारला..
    "बाळ लोके तर जमली पण याला संघटनेचे रुप देणार कि नाही? काहि नाव सुचतय का संघटने साठी?"
    बाळ उत्तरला.."विचार तर चालु आहे..पण संघटनेला नाव..."
    "मि सांगतो नाव.....शिवसेना"
    १९ जुन १९६६..शिवाजी पार्क..हजारोंनि जमलेला मराठी माणुस. आणि स्थापन झाली शिवसेना. गर्दी आणि ठाकरे हे इथे जुळलेले गणित आजतागायक फ़िसकटलेले नाहिये.

    नव्वदिचा काळ, राष्ट्रिय नेत्यांनी यात्रा आयोजित केल्या होत्या. हिन्दुत्वाचा आवाज बुलंद होत होता. एकच लक्ष्य "राम मंदिर". शिवसेनेनेहि हिन्दुत्वाचा अंगार हातात घेतलेला. शेवटि ते झालेच. बाबरी मस्जिद आडवी केली गेली. त्या नंतर उसळला तो एकच दंगा. मि मि म्हणणारे आणि स्वतःला हिन्दु नेते म्हणवुन घेणार्यांचे हि परिस्थिती बघुन धाबे दणाणले. त्यानी सरळसोट जवाबदारी नाकारली. यात आम्हि नव्हतो. यात आमचा एकही माणुस नव्हता असतील तर ते असतील "शिवसैनिक". त्या वेळि बाळासाहेबांना विचारले गेले..
    "हे होते काय तुमचे शिवसैनिक?"
    या वेळि बाळासाहेब सहज म्हणुन गेले असते कि हे आमचे कोणच नव्हेत...
    पण छे.. शिवसैनिकांना एकटे टाकुनदेणारा हा नेताच नव्हे. त्याने संपुर्णपणे शिवसैनिकाची साथ दिली. आणि इथेच या नेत्यानी सांगीतले..
    "हे बाबरी पाडणारे जर माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे." (हे असे ’स्टेटमेंट्’ द्यायचे धाडस कोण्या नेत्यात असेल?)
    हा हिन्दुत्वाचा अंगार भल्याभल्यांना पेलवला नाही अपवाद केवळ एकच.. बाळासाहेब ठाकरे.

    मुंबईत दंगल उसळलि होती ९३ साली. त्या वेळि केवळ आणि केवळ शिवसैनिकांमुळेच मुंबई वाचली होती. सगळी बाळासाहेंची कडवट शिस्त, बुलंद हिन्दुत्वाचा बुलंद आवाज शिवसेना.

    जे कोणताही नेता जाहिर पणे बोलणार नाहि तेच हा नेता अगदी सहज पणे बोलुन जातो. कारण एकच ’आहे खरे तर का बोलु नये?’ आणि विचार एकल्यावर कोणिहि म्हणेल..अगदि माझ्या मनातले बोलला. काहि सरकारि कामे होत नाहित नुसत्या फ़ाईली गोळा होतात..काम कोण करणार? कामं का होत नाहित? या वेळि या नेत्याने सांगितले अरे या फ़ायली नुसत्या गोळा करुन काय ठेवताय मंत्रालयात. जर या फ़ायली मंत्रालयात नुसत्या पडुन राहणार असतील तर आग लावीन मंत्रालयाला. भुकंप झाला होता भुकंप या ’स्टेटमेंट’वर.

    पाकिस्तानच्या आतंकवादि कारवाया खुपच वाढल्या होत्या. होत होति नुसती घुसखोरी. आणि या सरकारचे काय चालु होते तर पाकिस्तानच्या टिम ला क्रिकेट खेळायला बोलवायचे, बाळासाहेबांचा रोखठोक सवाल..अरे या देशाच्या एवढ्या आतंकवादि कारवाया वाढल्या असताना कसल्या क्रिकेट खेळण्याच्या बाता करता? हे होता कामा नये. आणि बाळासाहेबांनी एकदाच सांगीतले
    " मी मुंबईत पाकिस्तानच्या टिमला खेळुन देणार नाहि."
    त्या वेळे पासुन ते आजच्या दिवसापर्यंत पाकिस्तान टिमने मुंबईत पाऊल ठेवलेले नाहि, अरे धाडसच नाहि. कोण या अंगाराशी खेळणार?
    या बाळासाहेबांनि अनेक पिढ्या पाहिल्या घडवल्या, शिवसैनिक घडवले. हे शिवसैनिक बाळासाहेबांसाठि जिव हि द्यायला तयार. केवळ बाळासाहेबांचा आदेश आहे म्हणुन आपल्या जिवाची फ़िकीर न करता अनेक शिवसैनिकांनी आपले रक्त सांडले आहे. हे केवळ आणि केवळ बाळासाहेबांच्या प्रेमापोटि. जिवाला जिव देणारि लाखो माणसे.
    "केवळ एक आदेश द्या साहेब जिवाचीही पर्वा करणार नाहि" हा शब्द आहे शिवसैनिकाचा.

    बाळासाहेब एक असं व्यक्तिमत्व कि ज्याची ओळख करुन देण्याची गरज नाहि. अख्खे महाराष्ट्र त्यांना साहेब या नावानी ओळखतो.
    एकटा माणुस, एक ज्वलंत विचार मनाशी, अंगार मुखाशी घेऊन एक संघटन बनवतो "शिवसेना". आज शिवसेनाचा विचार केल्या शिवाय एक हि राजकिय निर्णय घेतला जात नाहि एवढि प्रचंड ताकत. एकट्या माणसाच्या आवाजाने उभा पेटलेला महाराष्ट्र शांत होऊ शकतो तर शांत महाराष्ट्र पेटु शकतो.
    एक माणुस पुर्ण शिवाजी पार्क-"शिवतिर्थ" खचाखच भरवुच कसे शकतो, तेहि अनेक वर्षे सलग हे अजुन न सुटलेले कोडेच. म्हणुनच बाळासाहेब ठाकरे हे नुसते व्यक्तिमत्व नसुन एक चमत्कार आहेत.

    मराठि अस्मितेची आग ज्याने महाराष्ट्रातल्या मराठि माणसात धगधगत ठेवली अश्या व्यक्तिमत्वास माझे प्रणाम, त्यांचा आदर्श घेऊन महाराष्ट्र घडवायचा प्रयत्न करुया.
    जय महाराष्ट्र.


    Balasaheb Thackeray, HinduHruday Samrat, ShivSena, marathi Manus, ShivSena Pramukh, Marathi Asmita

    Read more! / पुढे वाचा..


    Monday, March 10, 2008

    अरे काहि तरि लिहि कि.. .
    माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो,बरेच दिवस झाले काहि लिहिलेच नाहि. लिहायला विषय तसे बरेच होते. ति मनसेची आंदोलने होती. उद्धव ठाकरेंचे शेतकर्यांसाठिचे दौरे आणि होणारि गर्दि, पवारांचे टोले, हरभजन वरचे माकडि आरोप, असुल-वसुल मंत्र्यांच्या माकड उड्या, हे आणि ते. पण आशिष तु काहिच का लिहित नाहिस? हा प्रश्न मला माझ्या मित्रांनी अगदि फ़ोन करुन विचारला (पैसे खर्च करुन). हो खरे आहे. लिहायला बरेच आहे, बरेच काहि घडतयं, बरच काहि घडणार आहे, सुचत हि आहे पण प्रश्न आहे वेळेचा.
    आमचे कॉल्रेज आम्हाला चांगलच पळवतयं. सकाळि सात ते रात्रि सात. एवढा वेळ पळापळ करायची मग उरलेल्या वेळात काहि तरी वहिवर काळे करत बसायचे. त्या असाइन्मेंट्सनी तर झिटच आणलिये. नुसतं पेन घासत बसलोय. बर ब्लॉगवर लिहायचे म्हणजे मराठित टंकलेखन..जरा जास्त वेळ लागतोच. बर पण आता मात्र ठरवलय़ काहिना काहि तरि लिहायचेच. येत्या २९ मार्च ला परिक्षा आहे, त्याचा हि अभ्यास आहेच.
    बरं एवढ्या वेळ मि ब्लॉग साठि काय केले हे तर जाणुन घ्या. नविन केलय बरेच काहि.. एक गोष्ट नविन ब्लॉगवर म्हणजे वरच्याबाजुला ’महाराष्ट्र फ़ॅक्ट्स’ म्हणुन एक बॉक्स दिसेल. या मध्ये महराष्ट्राबद्दल काहि गोष्टिं सांगितल्या जातिल/दिसतील. या फ़ॅक्ट्स दर वेळि वेगळ्या दिसतिल कारण या साठी काहि जावास्क्रिप्टींगचा वापर केला आहे मी. याहि वाचत चला.
    ब्लॉग चा चेहरा बदललाय. काहितरि आपलं तेचतेच टिपीकल ब्लॉग बघणार्यांना नविन काहि तरि द्यावे म्हटले. म्हणुन स्वत:चा ब्लॉग स्वत:च तयार केला, डिसाईन केला. त्याचा ’अपिअरन्सच’ बदलुन टाकला. हा ब्लॉग दिसतो कसा हे मला तुम्हि नक्कि कळवा.
    कळवायचे कसे हा एक बर्याच जणांपुढचा यक्ष प्रश्न. कमेंट तर द्यायची आहे पण कशी देऊ तेच कळत नाहि अश्यांसाठि खास SMS Service चालु केलिये. होय आता तुम्हि तुमच्या कंमेंट्स मला आता SMS नेही पाठवु शकता, आणि तेहि अगदि साध्या SMS च्या दरात. फ़क्त माझ्या ब्लॉगच्या मोबाईल नंबरवर मला SMS पाठवायचा आणि मला कळवायचं लेख/कविता कशी वाटली ते. तुमच्या कमेंट्स वाचुन मलाहि बरे वाटते तुमची मते कळतात आणखि दोन गोष्टी सुचतात. तर कंमेंट्स न विसरता देत जावा, एक तर ब्लॉगवर किंवा SMS मार्फ़त. SMS ने आलेल्या कमेंट्स बाकिच्या तमाम वाचकांशी ’शेअर’ केल्या जातील, केवळ तुमच्या नावाचा उल्लेख होइल. मोबाईल नंबर कुठेहि शेअर केला जाणार नाहि.कमेंट्स SMS ने देताना आपले नाव व ठिकाण न विसरता पाठवत चला.SMS साठि नंबर आहे: ९४ २३ २६ ८५७४ "नाव, ठिकाण, कमेंट" जरुर पाठवा.
    आणि सर्वात महत्वाचे म्हणजे "टेल अ फ़्रेन्ड" आता ’महाराष्ट्र माझा’ ब्लॉग बद्दल तुम्हि तुमच्या मित्रांना केवळ एका क्लिक वर कळवु शकता. फ़क्त यासाठि ब्लॉगवरती ठेवलेल्या लिंक वरती क्लिक करा. नंतर येणार्या वेब-पेज वरती तुम्ही तुमचे नाव आणि ई-मेल पत्ता, आणि मित्राचा ई-मेल लिहा व क्लिक करा. ’महाराष्ट्र माझा’ ची लिंक मित्राला पाठवलि जाईल. एका वेळि तिन मित्रांना तुम्हि ई-मेल करु शकता. जरुन आपल्या मित्रांना कळवा या ब्लॉग बद्दल.
    तर हे असे चाललय सगळे. म्हणुन काहि लिहिता आले नाहि या एक महिन्यात. पण आता जसे सांगितलं काहिना काहि तरी लिहायचा प्रयत्न करत राहिनच. केवळ तुमचा अशिर्वाद राहुदे नाहितर आम्हि लिहायचे आणि वाचायला कोणीच नाहि अशी काय तरी अवस्था व्हायची. जरुर ब्लॉग ला भेट देत रहा, प्रेम असचं अखंड राहुद्या.
    आपलाच मित्र आशिष.
    'Do You Know This?', ब्लॉगचा चेहरा, SMS Service, आणि टेल अ फ़्रेन्ड.

    Read more! / पुढे वाचा..



    स्वतःचा ’ईमेल’ नोंदवा व मोफ़त अपडेट्स मिळवा.
     
    SMS Alerts: मोफ़त माहिती मिळवा मोबाईल वर.

    ओळख ब्लॉगरशी.

    आशिष कुलकर्णी, महाराष्ट्र माझा हा ब्लॉग २००३ साली सुरु केला. मी संगणक व्यवस्थापन या विषया मध्ये उच्च शिक्षण घेतलेले आहे. माझ्या समाजकारण आणि राजकारण यांच्या आवडिपोटी चालु केलेला हा ब्लॉग आपल्या पसंतीस पडेल हिच आशा ठेवतो.


    Follow Ashish Kulkarni on twitter


    सेन्सेक्स चे आकडे (LIVE)
    BSE

    Graph

    NSE
    Graph
    सौजन्य: economictimes.com indiainfoline.com

    ताज्या बातम्या / Latest News






    © Ashish, Some Article can not be copied by any means without written permission.
    Life in BPO | Orkut Fun