We have moved, please visit
www.MaharashtraMajha.com

 
  माझ्या महाराष्ट्राचा माझा ब्लॉग ..महाराष्ट्र माझा..  
 

!! महाराष्ट्र माझा !!
               साम । दाम । दंड । भेद

 

Make HomePage | Bookmark this site! | Know Your IP



हेही वाचाच..
  • बाळ केशव ठाकरे.
  • मागिल काहि महिन्यातील लेख.


    Advertisement:
    SMS- JOIN MYSHIVSENA to 567673434 & become a proud member of ShivSena's SMS Group.


    आणखि काहि लिंक्स..
    लाईफ़ इन बीपीओ..
    ऑर्कुट मज्जा...
    या ग्रुप मध्ये सामिल व्हा.

    Enter your email address:

    Delivered by FeedBurner


    Thursday, March 13, 2008

    हिंन्दुत्वाचा टणत्कार. व्यंगचित्रकार ते हिन्दुह्रुदयसम्राट

    तोन्ड वाजवुन न्याय मिळत नसेल तर
    तोन्डात वाजवुन न्याय मिळवा,
    पण न्याय हा झालाच पाहिजे.

    एक माणुस तुमच्या माझ्या सारखाच, उंचीने आणि वजनाने मात्र कमीच. पाहत होता आपल्या आजुबाजुची परिस्थिती. होणारा मराठी माणसावरचा अन्याय, तोहि महाराष्ट्रातच. मूग गिळुन गप्प बसलेले सरकार. ती चारी बाजुने होणारी गळचेपी. आता काय करावे..आपण हि गप्प बसावे कि आवाज उचलावा. तो माणुस सामान्य नव्हता त्याने शांत बसणे हा विचार कधीच केला नाहि आणि फ़ुंकली तुतारि मराठि अस्मितेसाठी कारण तो होता बाळ ठाकरे.

    बाळने आपला तोफ़खाना उघडला. बघता बघता मावळे जमु लागले, ताकद वाढु लागली. पण नक्कि करु काय हा प्रश्न होताच. इथेच वडिलांनी प्रबोधनकार ठाकरेंनी प्रश्न विचारला..
    "बाळ लोके तर जमली पण याला संघटनेचे रुप देणार कि नाही? काहि नाव सुचतय का संघटने साठी?"
    बाळ उत्तरला.."विचार तर चालु आहे..पण संघटनेला नाव..."
    "मि सांगतो नाव.....शिवसेना"
    १९ जुन १९६६..शिवाजी पार्क..हजारोंनि जमलेला मराठी माणुस. आणि स्थापन झाली शिवसेना. गर्दी आणि ठाकरे हे इथे जुळलेले गणित आजतागायक फ़िसकटलेले नाहिये.

    नव्वदिचा काळ, राष्ट्रिय नेत्यांनी यात्रा आयोजित केल्या होत्या. हिन्दुत्वाचा आवाज बुलंद होत होता. एकच लक्ष्य "राम मंदिर". शिवसेनेनेहि हिन्दुत्वाचा अंगार हातात घेतलेला. शेवटि ते झालेच. बाबरी मस्जिद आडवी केली गेली. त्या नंतर उसळला तो एकच दंगा. मि मि म्हणणारे आणि स्वतःला हिन्दु नेते म्हणवुन घेणार्यांचे हि परिस्थिती बघुन धाबे दणाणले. त्यानी सरळसोट जवाबदारी नाकारली. यात आम्हि नव्हतो. यात आमचा एकही माणुस नव्हता असतील तर ते असतील "शिवसैनिक". त्या वेळि बाळासाहेबांना विचारले गेले..
    "हे होते काय तुमचे शिवसैनिक?"
    या वेळि बाळासाहेब सहज म्हणुन गेले असते कि हे आमचे कोणच नव्हेत...
    पण छे.. शिवसैनिकांना एकटे टाकुनदेणारा हा नेताच नव्हे. त्याने संपुर्णपणे शिवसैनिकाची साथ दिली. आणि इथेच या नेत्यानी सांगीतले..
    "हे बाबरी पाडणारे जर माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे." (हे असे ’स्टेटमेंट्’ द्यायचे धाडस कोण्या नेत्यात असेल?)
    हा हिन्दुत्वाचा अंगार भल्याभल्यांना पेलवला नाही अपवाद केवळ एकच.. बाळासाहेब ठाकरे.

    मुंबईत दंगल उसळलि होती ९३ साली. त्या वेळि केवळ आणि केवळ शिवसैनिकांमुळेच मुंबई वाचली होती. सगळी बाळासाहेंची कडवट शिस्त, बुलंद हिन्दुत्वाचा बुलंद आवाज शिवसेना.

    जे कोणताही नेता जाहिर पणे बोलणार नाहि तेच हा नेता अगदी सहज पणे बोलुन जातो. कारण एकच ’आहे खरे तर का बोलु नये?’ आणि विचार एकल्यावर कोणिहि म्हणेल..अगदि माझ्या मनातले बोलला. काहि सरकारि कामे होत नाहित नुसत्या फ़ाईली गोळा होतात..काम कोण करणार? कामं का होत नाहित? या वेळि या नेत्याने सांगितले अरे या फ़ायली नुसत्या गोळा करुन काय ठेवताय मंत्रालयात. जर या फ़ायली मंत्रालयात नुसत्या पडुन राहणार असतील तर आग लावीन मंत्रालयाला. भुकंप झाला होता भुकंप या ’स्टेटमेंट’वर.

    पाकिस्तानच्या आतंकवादि कारवाया खुपच वाढल्या होत्या. होत होति नुसती घुसखोरी. आणि या सरकारचे काय चालु होते तर पाकिस्तानच्या टिम ला क्रिकेट खेळायला बोलवायचे, बाळासाहेबांचा रोखठोक सवाल..अरे या देशाच्या एवढ्या आतंकवादि कारवाया वाढल्या असताना कसल्या क्रिकेट खेळण्याच्या बाता करता? हे होता कामा नये. आणि बाळासाहेबांनी एकदाच सांगीतले
    " मी मुंबईत पाकिस्तानच्या टिमला खेळुन देणार नाहि."
    त्या वेळे पासुन ते आजच्या दिवसापर्यंत पाकिस्तान टिमने मुंबईत पाऊल ठेवलेले नाहि, अरे धाडसच नाहि. कोण या अंगाराशी खेळणार?
    या बाळासाहेबांनि अनेक पिढ्या पाहिल्या घडवल्या, शिवसैनिक घडवले. हे शिवसैनिक बाळासाहेबांसाठि जिव हि द्यायला तयार. केवळ बाळासाहेबांचा आदेश आहे म्हणुन आपल्या जिवाची फ़िकीर न करता अनेक शिवसैनिकांनी आपले रक्त सांडले आहे. हे केवळ आणि केवळ बाळासाहेबांच्या प्रेमापोटि. जिवाला जिव देणारि लाखो माणसे.
    "केवळ एक आदेश द्या साहेब जिवाचीही पर्वा करणार नाहि" हा शब्द आहे शिवसैनिकाचा.

    बाळासाहेब एक असं व्यक्तिमत्व कि ज्याची ओळख करुन देण्याची गरज नाहि. अख्खे महाराष्ट्र त्यांना साहेब या नावानी ओळखतो.
    एकटा माणुस, एक ज्वलंत विचार मनाशी, अंगार मुखाशी घेऊन एक संघटन बनवतो "शिवसेना". आज शिवसेनाचा विचार केल्या शिवाय एक हि राजकिय निर्णय घेतला जात नाहि एवढि प्रचंड ताकत. एकट्या माणसाच्या आवाजाने उभा पेटलेला महाराष्ट्र शांत होऊ शकतो तर शांत महाराष्ट्र पेटु शकतो.
    एक माणुस पुर्ण शिवाजी पार्क-"शिवतिर्थ" खचाखच भरवुच कसे शकतो, तेहि अनेक वर्षे सलग हे अजुन न सुटलेले कोडेच. म्हणुनच बाळासाहेब ठाकरे हे नुसते व्यक्तिमत्व नसुन एक चमत्कार आहेत.

    मराठि अस्मितेची आग ज्याने महाराष्ट्रातल्या मराठि माणसात धगधगत ठेवली अश्या व्यक्तिमत्वास माझे प्रणाम, त्यांचा आदर्श घेऊन महाराष्ट्र घडवायचा प्रयत्न करुया.
    जय महाराष्ट्र.


    Balasaheb Thackeray, HinduHruday Samrat, ShivSena, marathi Manus, ShivSena Pramukh, Marathi Asmita

    9 Comments:

    Blogger Ashish said...

    साहेब आपण जे काही लिहिले आहे बाळासाहेबांबद्द्ल व शिवसेनेबद्द्ल एकदम दुरुस्त आहे. साहेबांच्यासारखेच आपले एका शिवसैनिकाचे लिखाण एकदम रोखठोक आहे.
    साहेबांच्याबद्द्ल सर्व माहिती आपण या लेखात दिली आहे त्याबद्द्ल मी समस्त शिवसैनिकातर्फे आपला आभारी आहे. ज्या शिवसैनिकानाही सर्व माहिती नाही त्यांनांही हा लेख मार्गदर्शक आहे.

    March 16, 2008 at 10:09 PM  
    Blogger Ashish said...

    नेता कसा असावा तर बाळासाहेबांच्यासारखा असावा.

    March 16, 2008 at 10:17 PM  
    Blogger Unknown said...

    HI ,
    Increase your revenue 100% of your blog bye converting into free website.
    Convert your blog "yourname.blogspot.com" to www.yourname.com completely free.
    Become proud owner of the (.com) own site .
    we provide you free website+ free web hosting + list of your choice of
    scripts like(blog scripts,CMS scripts, forums scripts and may scripts)
    all the above services are absolutely free.
    You can also start earning money from your blog by referring your friends.
    Please visit www.hyperwebenable.com for more info.
    regards
    www.hyperwebenable.com

    May 7, 2008 at 5:27 PM  
    Blogger Dr.Chinmay Kulkarni said...

    sahich lihilay balasahebanbaddal

    May 18, 2008 at 3:53 PM  
    Blogger Unknown said...

    are aavazzzzzzzzzzzzzz kunacha sss shivsenecha

    July 30, 2008 at 6:11 PM  
    Blogger Unknown said...

    shiv senechya vatela jar yal tar........
    angavar gghetalyashivay rahanar nahi

    July 30, 2008 at 6:12 PM  
    Blogger satish panpatte said...

    मस्त लेख आहे मित्रा ! शिवसेनेत लिहणा-यांची पिढी येणार आहे ह्याचे संकेत आहे हे :)
    साहेबांच्या जन्मदिनानीमीत्त सगळिकडे हा लेख गेला पाहिजे.. विदर्भात इकडे मि माझे लेख देतोच...\

    साहेबांसाठी खास...


    ठिणगी पडली अस्मितेची, यद्न्यकुंड धगधगले सारे |
    पराक्रमाच्या ज्वाळा उठती, फुंकर घाली भगवे वारे |
    बघा रुषी तो यद्न्यी बैसला, त्यागाची आहुती द्यारे |
    हिन्दुह्रुदयसम्राट असे तो, नाव तयाचे बाळ ठाकरे..... |

    November 3, 2008 at 1:45 PM  
    Blogger s-r-k said...

    kahrech asa NETA parat hone nahi .........

    May 4, 2009 at 12:21 AM  
    Blogger Unknown said...

    bal keshav thakare...ek vyang chitrakar.

    balasaheb......apla asamanya neta...

    sundar lekh.
    साहेबांच्याबद्द्ल सर्व माहिती आपण या लेखात दिली आहे त्याबद्द्ल मी समस्त शिवसैनिकातर्फे आपला आभारी आहे.

    jai maharashtra......

    August 10, 2009 at 3:10 PM  

    Post a Comment

    Feel free to type your comments here

    Subscribe to Post Comments [Atom]

     



    स्वतःचा ’ईमेल’ नोंदवा व मोफ़त अपडेट्स मिळवा.
     
    SMS Alerts: मोफ़त माहिती मिळवा मोबाईल वर.

    ओळख ब्लॉगरशी.

    आशिष कुलकर्णी, महाराष्ट्र माझा हा ब्लॉग २००३ साली सुरु केला. मी संगणक व्यवस्थापन या विषया मध्ये उच्च शिक्षण घेतलेले आहे. माझ्या समाजकारण आणि राजकारण यांच्या आवडिपोटी चालु केलेला हा ब्लॉग आपल्या पसंतीस पडेल हिच आशा ठेवतो.


    Follow Ashish Kulkarni on twitter


    सेन्सेक्स चे आकडे (LIVE)
    BSE

    Graph

    NSE
    Graph
    सौजन्य: economictimes.com indiainfoline.com

    ताज्या बातम्या / Latest News






    © Ashish, Some Article can not be copied by any means without written permission.
    Life in BPO | Orkut Fun