We have moved, please visit
www.MaharashtraMajha.com

 
  माझ्या महाराष्ट्राचा माझा ब्लॉग ..महाराष्ट्र माझा..  
 

!! महाराष्ट्र माझा !!
               साम । दाम । दंड । भेद

 

Make HomePage | Bookmark this site! | Know Your IP



हेही वाचाच..
मागिल काहि महिन्यातील लेख.


Advertisement:
SMS- JOIN MYSHIVSENA to 567673434 & become a proud member of ShivSena's SMS Group.


आणखि काहि लिंक्स..
लाईफ़ इन बीपीओ..
ऑर्कुट मज्जा...
या ग्रुप मध्ये सामिल व्हा.

Enter your email address:

Delivered by FeedBurner


Tuesday, March 18, 2008

मी राहतो सध्या पुण्यात, पुणे म्हणजे काय एकदम भारी. पुण्यात काय कमी आहे ते सांगा. पुण्यात आल्यावर मीटर मध्ये गोची करुन फ़सवणारे रिक्षावाले आहेत. ’चकचकित’ रस्ते आहेत, काय तो अपवाद असेल तो असेल, दर शंभर मीटरला पाच-दहा खड्डे म्हणजे काय विशेष? भरगच्च भरुन खळखळत वाहणारि पीएमटी आहे (आता याला पीएमपीएल म्हणतात). चालायला काहि रस्त्यांवरती तर चक्क फ़ुटपाथ आहेत. दर दोन मिनीटांनी एक मिनिट थांबवुन ठेवणारे सिग्नल्स आहेत. अगदि श्वासाश्वासात पुणे वसावे म्हणुन रस्त्यांवरती धुळिचे साम्राज्य आहे. सकाळि जाउन संध्याकाळि घरी आले कि कसे अगदि छाती मध्ये अर्धा-एक किलो ’पुणे’ असतेच. सगळे कसे अगदि सुरळित चालु आहे. एकदम फ़ॉरेन मध्ये राहिल्या सारखे वाटतेय.
पण अचानक हे काय घडले? पुण्यात भारनियमनाच्या बाता? दिड तास पुण्यात वीज जाणार म्हणे. हे ऐकल्यावर आपण एकदम महाराष्ट्रात राहतोय कि काय असेच वाटायला लागलयं. काय ती पुण्याची शान आणि तिथे आता भारनियमन लागु करणार?
खरं सांगु मनात कुठेतरी बरेचं वाटले कि आता पुण्यात हि भारनियमन होणार. महाराष्ट्रातली खेडी १६-१८ तास भारनियमाने ग्रस्त असताना पुण्यात जाहिरीतांच्या होर्डिंग्जवर होणारी दिव्यांची उंदंड उधळपट्टी बघुन उगीचच वाईट वाटायचे. एकिकडे विहिरीत पाणि असुन ते वीज नसल्यामुळे पिकांना पाणि न पाजु शकणारा, कोरड्या शेतीकडे हताशपणे पाहत बसणारा माझा शेतकरी तर इकडे.. आमच्यात सेल आहे आमच्या कडे या म्हणुन घसा कोरडे करणारे जाहिरातीचे जंबो फ़लक. हा विरोधाभास कुठे तरी थांबवलाच पाहिजे होता.
पुण्यात अनेक उद्योग आहेत, त्यावर अनेक पोटे भरतात म्हणुन इथे भारनियमन नाहि. खेड्यात राहणार्यांना मग काय पोटच नाहि काय? अरे दुकान उघडु कधि हा इथल्या दुकानदांरांना पडणारा प्रश्न. आता तर उन्हाळा येतोय. लहान लेकरांचं रडुन रडुन आता हाल बेहाल होतील, कारण डोक्यावर पंखा आहे पण तो चालु करायला वीजचं नाहि.
काय तो माझा एकवेळचा महाराष्ट्र आणि काय त्याचे आज हाल करुन ठेवले. अरे रोज १०-१२ तास लोके बिना वीज ठेवता तुम्हि? संध्याकाळि सर्वत्र अंधारचे साम्राज्य. संध्याकाळि कुठे बाहेर फ़िरायला जाणे झालयं मुश्किल. गेल्या आठ वर्षे महाराष्ट्राचा कारभार करता तुम्ही आणि आज महाराष्ट्राची हालत काय तर सगळा महाराष्ट्र अंधारात. अरे लाजा कश्या वाटत नाहि असला कारभार करुन वर उजळ माथ्याने फ़िरताना. लोंकाच्या मनात हि आता एवढा राग आहे कि एकदा आमच्या महाराष्ट्राचे हे ’कंदिल मंत्र’ लोकाना भेटायला म्हणुन आपल्या ताफ़्या सह गेले होते. तिथल्या लोकांनी एकदम ऐतिहासक स्वागत केले यांचे. सडके टॉमेटो, अंडि, दगडं आणि चपला हाणल्या डोक्यात. या ’कंदिलरावांच्या’ गाडिवर दगडफ़ेक. कंदिलराव एवढे घाबरले कि आपला ताफ़ा वगैरे सगळे सोडुन पोलिसांच्या जिप मधुन तिथुन पळ काढला. तर अशी हि आमच्या आदरणीय मंत्र्याची अवस्था. लोकांना तोंड पण दाखवायची आता यांची उरली नाहि.
जमत नाहि आपल्याला एखाद्या खात्याचा कारभार तर सरळ लोकहिता साठि सोडुनद्यावाना कारभार. बसवावे या जागेवर एखाद्या लायक माणसाला का एकदा चिकटले कि सोडायचेच नाहि. किमान अंडि-टोम्याटोंचा आहेर तरी मिळाला नसता. फ़ेविकॉलने या मंत्र्यांना आपला ब्रॅंड अंब्यासिडर म्हणुन घ्यावे. यांचा खप दुपटिने काय तिपटिने वाढेल. कारण हि वांगी एकदा खुर्चिला चिकटली कि हा जोड तोडणे ’मुश्किल हि नहि नामुमकिन है’ हे सगळे जग पाहतच आहे.
आज महाराष्ट्राची अवस्था बिकट आहे. आपल्या राज्याचा विकास अगदि बैलगाडिच्या वेगाने होत आहे. केवळ मुंबई-पुणे-नाशिक हा पट्टाच म्हणजे महाराष्ट्र नव्हे. महाराष्ट्र खुप मोठा आहे. विकास महाराष्ट्राच्या कोपर्या कोपर्या पर्यंत पोहचला पाहिजे. विकासासाठि काहि गोष्टि अश्या आहेत कि त्या अगदि मुलभुत आहेत. तुम्हि मुबलक स्वरुपात वीज द्या. तुमचा विकास हा आपोआप होइल. विजे करता नवीन ’प्रोजेक्ट्स’ आणा. विजतारांचे चांगले जाळे विणा. त्यावेळि या विजतारांमधुन केवळ विजच वाहत येणार नाहि तर विकास हि वाहत येइल. लोकांचे जिणे सुकर होइल.
या करता काय केले आमच्या कंदिलरावांनी? तर काहि नाहि. आठ वर्षात एक मेगावॅट विज नाहि तयार करु शकला तुम्हि? आता विजेची तफ़ावत आपल्या राज्यात किती तर एक दोन नव्हे तर तब्बल पाचहजार मेगावॅटची. आता मात्र यांच्या त्याला आग लागल्या सारखे आरडा ओरडा करत आहेत. आम्हि हा प्रोजेक्ट आणु आणि आम्हि ते करु. अरे विज म्हणजे काय यांना खोटे रेशन कार्ड वाटले काय? कि चारले थोडे पैशे कि घरपोच हजर. विजेसाठि दुरद्रुष्टि ठेवुन कारभार करावा लागतो. इथे दुर काय द्रूष्टिच नाहि. वाट लावुन ठेवली महाराष्ट्राची.
आता इलेक्शन्स येत आहेत. या वेळि तरी जनतेनी योग्य निर्णय घ्यावा. शेतकर्यांना मोफ़त विज देतो असे सांगुन सत्तेत आले आणि हालत काय तर ५००० हुन जास्त शेतकर्यांच्या आत्महत्या. या आत्महत्या नाहियेत तर सरकारच्या दळभद्रि कारभाराने केलेल्या हत्या आहेत. या हत्यांची पापं या सरकारला फ़ेडावीच लागणार. सरकारचे काम असते राज्याच्या संसाराचा गाडा सुखाने चालवायचा. जनतेने विश्वास ठेवुन यांना आपला कारभारी म्हणुन निवडला पण या संसाराची अत्ताची हालत कशी तर.. ’पति कमजोर और पत्नि निराश’.
जनता आता अगदि वैतागुन गेलिये. कामाच्या नावाने पैसे तर तिजोरितुन जातात पण काम? नुसता भ्रष्टाचार. हे आता थांबवावे लागणार. आता या कारभार्यांशी नाते तोडावेच लागणार. नाहि तर महाराष्ट्रात १८ काय २४ पैकि २४ तास भारनियमन करावे लागेल. आणि हे नाते तोडायचे काम महाराष्ट्राच्या जनतेलाच करावे लागणार.. असे नाहि झाले तर तुमचे जिणे तुम्हालाच चांगभले. हे असे अंधारात जिणे तुम्हाला आवडेल काय?

6 Comments:

Blogger मोरपीस said...

खरच महाराष्ट्राचा विकास महाराष्ट्राच्या कोपर्या कोपर्या पर्यंत पोहचला पाहिजे.

March 18, 2008 at 7:20 PM  
Blogger Akshay kashid said...

chan lhiila aahe mitra

March 18, 2008 at 10:22 PM  
Blogger Manav said...

Full to Dhamal Yar ! Good One

March 20, 2008 at 5:07 PM  
Blogger Suunil Yadav said...

खरोखरीच हा असा लेख लिहिने फार आवश्यक होते. पुण्याच्या नेते लोकानी भ्रष्टाचाराचा भस्मासुर एवढा मोठा केला आहे की आम्ही पुण्याचे आहोत हे सांगायला लाज वाटते. पुण्यातील रस्ते आणि पाणी हा अत्यन्त ज्वलंत प्रश्न आहे आणि नेते लोकाना त्याची कसलीच चाड नाही. बेशरमपनाचा जिवंत नमूना आपल्या पुण्याशिवाय कोठेच बघायला मिलनार नाही. लोकंच्याकडून एवढा दाम्दुप्पट कर वसूल करून सुद्धा त्यांना काहीही सुविधा न देण्याची प्रवृत्ति आपल्या नेत्यांशिवाय कोठेही सापडनार नाही. हे पुण्याच्या मतदारानो आतातरी जागे व्हा. ह्यांच्या कोणत्याही भूलथापाना बली पडू नका. नेते लोकाना पैसे कमावायाचे आहेत. त्यांचे प्रयत्न हानून पाडा.
sunil Yadav

March 20, 2008 at 6:28 PM  
Blogger Unknown said...

mahiti sarve theek aahe , pun thodya vyakaranachya chuka sucharlya tar bare hoel..........

May 19, 2008 at 7:14 PM  
Blogger Dinesh Gharat said...

लय भारी लिहीता तुम्ही राव. पुन्याले तुम्हि लयच आब्जर्व केला वाटते. अरं पुन्यात काय काय हाय ते तुमचा आर्टिकल का काय मन्तेत ते वाचुन कळला. लयच झ्याक.

दिनेश.
http://www.sarvottam-marathi-vinod.blogspot.com

June 28, 2008 at 10:28 PM  

Post a Comment

Feel free to type your comments here

Subscribe to Post Comments [Atom]

 



स्वतःचा ’ईमेल’ नोंदवा व मोफ़त अपडेट्स मिळवा.
 
SMS Alerts: मोफ़त माहिती मिळवा मोबाईल वर.

ओळख ब्लॉगरशी.

आशिष कुलकर्णी, महाराष्ट्र माझा हा ब्लॉग २००३ साली सुरु केला. मी संगणक व्यवस्थापन या विषया मध्ये उच्च शिक्षण घेतलेले आहे. माझ्या समाजकारण आणि राजकारण यांच्या आवडिपोटी चालु केलेला हा ब्लॉग आपल्या पसंतीस पडेल हिच आशा ठेवतो.


Follow Ashish Kulkarni on twitter


सेन्सेक्स चे आकडे (LIVE)
BSE

Graph

NSE
Graph
सौजन्य: economictimes.com indiainfoline.com

ताज्या बातम्या / Latest News






© Ashish, Some Article can not be copied by any means without written permission.
Life in BPO | Orkut Fun