हेही
वाचाच.. |
|
मागिल
काहि
महिन्यातील लेख. |
|
Advertisement: SMS- JOIN MYSHIVSENA
to 567673434 & become a proud
member of ShivSena's SMS Group. |
|
घरे मराठी माणसांनाच द्या.
म्हाडाने गृहयोजनेतील ८० टक्के घरे मराठी माणसांनाच द्यावीत, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. मुंबई सर्वप्रथम मराठी माणसांची आहे. त्यामुळे घरे देताना मराठी माणसांना प्राधान्य द्यायलाच हवे असे शिवसेनेचे म्हणणे आहे. पैसे घेऊन बेकायदा परवाने मंजूर केले जातात. परप्रांतियांनी अनधिकृत बांधकाम केले तरी त्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळेच मुंबईतला मराठी माणसाचा टक्का कमी होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि राज्याच्या राजधानीतला मराठी टक्का वाढवण्यासाठी म्हाडाने मराठी माणसांना योजनेतील ८० टक्के घरे द्यायला हवीत अशी मागणी शिवसेनेने केली आहे. अनेक अमराठींना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे. मुंबईतला मराठी टक्का वाढला तर त्यांचा डाव उधळून लावता येऊ शकतो. त्यामुळे म्हाडाने मराठी माणसांना प्रामुख्याने घरांचे वाटप करावे, असे आवाहन शिवसेनेने केले आहे. दरम्यान, मुंबईतल्या गृहनिर्माण योजनेसाठी म्हाडाने सोमवारी सकाळपासून सर्वसामान्यांना अर्ज वाटप सुरू केले आहे. अर्जाची किंमत १०० रुपये असून ते फक्त एचडीएफसीच्या मुंबईतील २२ शाखांमध्ये उपलब्ध आहेत. अर्ज मिळवण्यासाठी मुंबईकरांची झुंबड उडाली आहे. तीन हजार ८६३ घरांसाठी हजारो मुंबईकर रात्रीपासूनच बँकेच्या विविध शाखांवर रांगेत उभे आहेत. त्यामुळे बँकेच्या सगळ्या शाखांना पोलिस बंदोबस्त पुरवण्यात आला आहे.
|
|
ओळख
ब्लॉगरशी. |
|
आशिष कुलकर्णी, महाराष्ट्र माझा हा ब्लॉग २००३ साली सुरु केला. मी संगणक व्यवस्थापन या विषया मध्ये उच्च शिक्षण घेतलेले आहे. माझ्या समाजकारण आणि राजकारण यांच्या आवडिपोटी चालु केलेला हा ब्लॉग आपल्या पसंतीस पडेल हिच
आशा ठेवतो. |
|
सेन्सेक्स चे आकडे
(LIVE) |
|
BSE |
|
NSE |
|
सौजन्य:
economictimes.com indiainfoline.com
ताज्या
बातम्या / Latest News |
|
|
1 Comments:
Hoy
Ghare marathi manasanach dili pahijet
Post a Comment
Feel free to type your comments here
Subscribe to Post Comments [Atom]