We have moved, please visit
www.MaharashtraMajha.com

 
  माझ्या महाराष्ट्राचा माझा ब्लॉग ..महाराष्ट्र माझा..  
 

!! महाराष्ट्र माझा !!
               साम । दाम । दंड । भेद

 

Make HomePage | Bookmark this site! | Know Your IP



हेही वाचाच..
मागिल काहि महिन्यातील लेख.


Advertisement:
SMS- JOIN MYSHIVSENA to 567673434 & become a proud member of ShivSena's SMS Group.


आणखि काहि लिंक्स..
लाईफ़ इन बीपीओ..
ऑर्कुट मज्जा...
या ग्रुप मध्ये सामिल व्हा.

Enter your email address:

Delivered by FeedBurner


Monday, December 31, 2007

माझ्या "गुजरात एक्के "मोदी". गुजरात दोनी "मोदी".... " या लेखाला दिलेल्या प्रतिसादा बद्द्ल धन्यवाद.

आज काल अनेक वॄत्त पत्रांमधुन लेख येतात कि मराठी मुलांनी काय केले पाहिजे आपल्या ’करिअर’ च्या वाटा कश्या निवडाव्यात वगैर वगैर... त्यात आणखिन आशादायक चित्र म्हणजे अगोदर येणार्या सुचना जश्या की
मराठी मुलाने काय करावे...तर आपापले उद्योग चालु करावेत..मराठी मुलाने मेणबत्त्या बनवाव्यात..मराठी मुलाने उदबत्त्या बनवाव्यात..त्या दारोदारी जाउन विकाव्यात कोणतेही काम कमी मानु नये ह्यों करावे अन त्यों करावे..या बंद झालेल्या आहेत. बरं ऊत्सुकते पोटी जाउन जरा माहिती काढावी तर या महाशयांची मुले मात्र आ.टी कंपनीत कामाला. यांना बरे नाही मेणबत्त्या बनवायला बसवले?
पण हां या वॄत्तपत्रां मधुन आज जे काही BPO बद्द्ल लिहलं जातय त्याला मात्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकं आज किमान चर्चा करतायत आपल्या मुलास (लाडाने कार्ट्यास) इथे जॉब मिळु शकतो का या बद्दल चौकश्या होऊ लागल्यात. आम्ही हि एका प्रतिष्टित बीपीओ मध्ये एक वर्ष भर काम केले असल्या मुळे या अश्या चौकश्या आमच्या पाशी तर अनेकदा होतात. पण याचा फ़ायदा माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणास व्हावा म्हणुन आज लेखणि हातात घेतली. (खरं म्हणजे किबोर्ड हातात घेतला).

काय असते हो हे ’बीपीओ’ म्हणजे?

सांगतो पण समजावे म्हणुन उदाहारण देऊन सांगतो.
माझी एक मोठी कंपनी आहे, त्यात ५००० कामगार आहेत. मला यांची रोज हजेरी नीट बघुन बरोबर १ तारखेला यांचा पगार द्यायचा असतो. पण हा व्यापच एवढा मोठ्ठा आहे की या पगार व्यवस्थित व्हावा या एका कारणा साठी मला आणखि ५० लोके कामाला ठेवावी लागता भरिस भर म्हणुन जो वेळ मि माझ्या इतर महत्वांच्या कामाला देऊ शकतो तो वेळ या ५० जणांवर खर्च करवा लागतो. काहि समजेना हा वेळ आणि पैसा कसा वाचवावा.
त्याच महिन्यात एक कंपनी मझ्या कडे आली आणि तिने (कंपनीने) मला सांगीतले की हे पगार व्यवस्थापनाचे काम जे तुम्ही तुमचा वेळ व पैसा खर्च करुन करत आहात तेच काम अम्ही तुम्हाला करुन देऊ. आम्ही घेऊ तुमच्या कंपनींच्या एका पुर्ण विभागाची जवाबदारी. तुम्ही काय करायचे तर त्या मोबदल्यात आम्हाला आमची फ़ी द्यायची. कल्पना खुप आवडली.
हिशोब मांडला तर असे लक्षात आले कि यात आपला वेळ हि वाचतोय आणि पैसाही. मग मि काय केले तर मझ्या Payroll Department ची पुर्ण जवाबदारी त्या बाहेरच्या कंपनीस देऊन टाकली. बरं काम अगदी जवाबदारिचे आणि जोखमीचे असल्याने कायदेशीर बाबी हि नीट तपासुन घेतल्या आणि मग मि माझ्या एका डिपार्टमेंट चे काम त्या कंपनीला Outsource केली.
BPO म्हणजे Business Process Outsourcing.
एखादी कंपनी आपल्या एका विभागाचे अथवा जवाबदारिचे काम बाहेर्च्या एका जवाबदार कंपनीस पार पाडायला देते.
बरं या व्यव्हारातुन माझा कसा फ़ायदा झाला बघा.........मी जी ५० माणसे कामाला लावली होती ती आता मी Production Supervisor म्हणुन लावली साहजिकच माझे उत्पन्न वाढले. तेहि ५० माणसांना एक्स्ट्रा पगार न देता. वरती माझा पुर्ण वेळ मी मझ्या महत्वांच्या कामांना देऊ शकलो...वेळ हि वाचला पैसा हि वाचला. म्हणुन होते Outsourcing.

हि कामे कोण करतो?
भारतात अनेक बड्या कंपन्या आहेत जी हि कामे करतात. यातील प्रचंड नफ़ा पाहुन इन्फ़ोसिस, विप्रो, सत्यम, आयबिअम अश्या अनेक दिग्गज कंपन्या या क्षेत्रात आल्या आहेत.

फ़ायदा कसा मिळतो?
मुख्यत्वे ज्या कंपन्या आपले काम बाहेरिल कंपनीस देतात त्या असतात बड्या राष्ट्रातील बड्या कंपन्या. ते आपल्याला बिल देतात ते डॉलर मध्ये आणि आपला खर्च होतो रूपया मध्ये..मधल्या मध्ये या कंपन्यांना बरीच रक्क्म फ़ायदा म्हणुन मिळुन जाते.

इथे जॉब कसा मिळेल?
या कंपन्यां मध्ये काम मिळवण्या साठी तुम्हि ग्र्याजुएट (Graduate) असणे आवश्यक आहे. मग तुम्ही कोणत्याही शाखे मधुन असाल. काही ठिकाणी कामाचा अनुभव असतो म्हणुन १२वी पास सुद्धा चालतात. पण हो उगीच मिळतीये नोकरी म्हणुन शिक्षण १२वीत थांबवु नका. Graduate व्हाच.
तुमची इंग्रजी भाषेवरती चांगली पकड असलीच पाहिजे. कारण आपला क्लाएंट हा भारतीय असेलच असे नाही. जर इंग्रजी भाषेवर पकड नसेल तर आधी ती मिळवा व मग इन्टर्व्युह ला निघा. (याला काही अपवाद हि आहेत.)

संगणकाची किमान माहिती असणे ही आवश्यक आहे, काही जास्त नको MS-CIT पुरे आहे. तुम्ही संगणक साक्षर असणे आवश्यक आहे.
कम्युनिकेशन स्किल्स जर मस्त असेल तर मात्र तुमचे काम अर्धे झाले म्हणुन समजा.
व्यवसाय प्रक्रियांचे सखोल अभ्यास. (Process knnowledge ex. Banking, Finance, Insurance, Telecommunications etc.)
एक टीम म्हणुन काम करण्याची तयारि..सांघीक भावना.
आणि प्रचंड कष्ट करण्याची तयारी.

या काहि किमान स्किल्स तुमच्यात असणे आवश्यक आहेत.

कॉल सेन्टर म्हण्जेच बीपीओ..एक गैरसमज.
कॉल सेन्टर म्हण्जेच बीपीओ हा एक निव्वळ गैरसमज आहे. कॉल सेन्टर हा एक बीपीओ चा एक भाग आहे. पण बीपीओ म्हणजे केवळ कॉल सेन्टर म्हणणे चुकिचे आहे.

नाईट शिफ़्ट्स...........मोठा प्रश्न.
बीपीओ मध्ये आलो म्हणजे आता केवळ नाईट मारायच्या हे काही खरे नाही. शिफ़्ट टाईम ठरतात त्या प्रोसेस कोणती आहे या वरुन. जितके लोक रात्रि काम करतात त्याहुन कितीतरी अधिक जणं दिवसा काम करतात. पण हो आता मराठी तरुणाने हि नाटकं सोडुन कामाला लागावे. मला जमेल की नाही? माझ्या झोपेचे काय? जर इतर लाखो लोकांना जमतय तर तुला का नाही...ते जमणार नाही तुला ते जमवावे लागणारच............आणि खरे सांगु ते आपोआप जमतं काही करावे लागत नाहि विशेष.

तर मित्रांनो या क्षेत्रात प्रचंड पैसा आहे...जरुरत आहे तर एका जिद्दिची, ताकतीची आणि प्रचंड कष्टाची.
तुम्ही केवळ धाडस जमवुन या क्षेत्रात झेप घ्या यश हे केवळ आणि केवळ आपलेच.


आपले काही आणखी प्रश्न असतील व आपल्याला हा लेख वाचल्यावर काय वाटले हे मला कळवण्या साठी खाली Comments वर क्लिक करा.

आपलाच मित्र,
आशिष कुलकर्णी.

3 Comments:

Blogger Unknown said...

Hi ashish..article is really good. Keep it up.

January 3, 2008 at 7:18 PM  
Anonymous Anonymous said...

Thanks for guidance,
I was in bad need of such guidance.

January 4, 2008 at 1:04 PM  
Blogger Swapnil M Kadam said...

Really a nice blog.....
U've explained BPO with easy e.g.
Thanks for that.
Peop will definitely get benefited from it n would try to persue a career in this field.
Bye & Take Care.

February 22, 2008 at 10:42 PM  

Post a Comment

Feel free to type your comments here

Subscribe to Post Comments [Atom]

 



स्वतःचा ’ईमेल’ नोंदवा व मोफ़त अपडेट्स मिळवा.
 
SMS Alerts: मोफ़त माहिती मिळवा मोबाईल वर.

ओळख ब्लॉगरशी.

आशिष कुलकर्णी, महाराष्ट्र माझा हा ब्लॉग २००३ साली सुरु केला. मी संगणक व्यवस्थापन या विषया मध्ये उच्च शिक्षण घेतलेले आहे. माझ्या समाजकारण आणि राजकारण यांच्या आवडिपोटी चालु केलेला हा ब्लॉग आपल्या पसंतीस पडेल हिच आशा ठेवतो.


Follow Ashish Kulkarni on twitter


सेन्सेक्स चे आकडे (LIVE)
BSE

Graph

NSE
Graph
सौजन्य: economictimes.com indiainfoline.com

ताज्या बातम्या / Latest News






© Ashish, Some Article can not be copied by any means without written permission.
Life in BPO | Orkut Fun